Chhava esakal
Premier

Chhava: "मायबाप रसिकांचा आशीर्वाद..."; संतोष जुवेकरनं शेअर केला 'छावा' च्या सेटवरील खास व्हिडीओ

Chhava: मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) छावा या चित्रपटाच्या सेटवरील खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Chhava: गेल्या काही दिवसांपासून विकी कौशलच्या (Vicky Kaushal) छावा (Chhava) हा चित्रपट चर्चेत आहे. छावा चित्रपटातील विकीच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच आता मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) छावा या चित्रपटाच्या सेटवरील खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

संतोष जुवेकरची पोस्ट

संतोष जुवेकरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विकी आणि संतोष हे दोघे मजा-मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओला संतोषनं कॅप्शन दिलं, "फायनली माझं शूट संपलं. पण शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल तर काम बहारदार रंगत आणि मनही कामात रमतं. या क्लिपमधून तुम्हला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल पण मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेंव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याचिसुद्धा कल्पना येईल."

"आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेंव्हा नवीन माणसांची नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं. आमच्या आयुष्यात आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिली. लक्ष्मण उतेकर सरांनी तुम्हाला आणि आपल्या डायरेक्शन टीमला आपल्या संपूर्ण मोडॅक प्रोडक्शन टीमला, आपले DOP सौरभ sir, बबलू sir, fight director परवेज भाई त्यांची टीम आपले सगळे खाउपियू घालणे डिपार्टमेंट वाले आणि सगळेच तुम्हां सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी.", असंही संतोषनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

पुढे संतोषनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "विकी कौशल पाजी , ashish pathode, अंकित, शुभांकर, बालाजी sir, pradeep sir, तुम्हां सगळ्यांना big love u आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा , छत्रपती शिवाजी महाराजांचा , छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशीर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चलो भेटूयात लवकरच तोपर्यंत..... जय भवानी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT