Chinmayi Sripada X Post Assaulted Esakal
Premier

Chinmayi Sripada: सैराटमधील गायिकेचा पद्मश्री विजेत्याकडून छळ, चिन्मयीच्या पोस्टमुळे फिल्म इंडस्ट्रीत खळबळ

Chinmayi Sripada X Post: या पीडित गायिकेने दाक्षिण्यात चित्रपटांसह हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सैराट चित्रपटातील 'सैराट झालं जी' हे गीत प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

आशुतोष मसगौंडे

दक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने पद्मश्रीसह अनेक मोठे पुरस्कार जिंकणाऱ्या गीतकारावर गंभीर आरोप केले असून. तिच्यासह तीन महिलांचा छळ या गीतकाराने केल्याचा आरोप चिन्मयीने केला आहे.

चिन्मयीने नुकतीच एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने एका गीतकारावर गंभीर आरोप केले आहेत. चिन्मयीने छळ करणाऱ्या गीतकाराचे नाव वैरामुथु असल्याचे आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

चिन्मयी श्रीपदाने दाक्षिण्यात चित्रपटांसह हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सैराट चित्रपटातील 'सैराट झालं जी' हे गीत प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

एक्स पोस्टमध्ये काय म्हणाली चिन्मयी

एक गीतकार, पद्म पुरस्कार विजेता, संगीत नाटक अकादमी विजेता आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या व्यक्तीने माझा छळ केला आहे. मीडियासमोर माझ्यासह 3 महिलांनी त्याचे नाव घेतले आहे. मी गेल्या सहा वर्षांपासून हे सांगत आहे तरीही त्याला व्यासपीठ मिळत असून, तामिळनाडूतील प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांना संरक्षण दिले आहे. मी अनेकांना, वैरामुथू यांनी माझा विनयभंग केल्याचे सांगितले आहे."

कोण आहे चिन्मयी श्रीपदा?

सुप्रसिद्ध पार्श्वगायिकांच्या यादीत चिन्मयी श्रीपदाच्या नावाचा समावेश आहे. चिन्मयी बहुतेकदा दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीत सक्रिय असते. मात्र, सध्या चिन्मयीने तिच्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे.

चिन्मयीने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही पार्श्वगायिकेची भूमिका बजावली आहे. तिने गायलेल्या सुप्रसिद्ध गीतांमध्ये सैराट झालं जी, चेन्नई एक्सप्रेसमधील तितली, गीता गोविंदममधील येंते येंते या गाण्यांचा समावेश आहे.

कोण आहेत वैरामुथु रामासामी?

वैरामुथु रामासामी हे तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आहेत. वैरामुथु हे प्रामुख्याने तमिळ सिनेमातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. कल्लिकट्टू इथिकसम, करुवाची कविम, मुंदरम उलागापोर आणि इतर अनेक कलाकृती त्यांच्या नावावर आहेत.

वैरामुथु यांनी काही परदेशी कवींची आणि त्यांच्या कलाकृतींचा तमिळ भाषेतील एला नदियिलम एन ओदुममध्ये परिचय करून दिला आहे. त्यांच्या काही कलाकृतींचे तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये भाषांतर झाले आहे. त्यांची शेकडो गाणी हिंदीत अनुवादित झाली आहेत.

वैरामुथु यांना त्यांच्या 'कल्लीकट्टू इथिकसम' या कादंबरीसाठी पद्मभूषण, पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारांसह विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. वैरामुथु हे आठ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT