bigg boss marathi 5 esakal
Premier

कलर्स मराठीचा झी वाहिनीला जोराचा धक्का; टीआरपी शर्यतीत टाकलं मागे, 'बिग बॉस मराठी ५' ने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड

Colors Marathi Beats Zee Marathi In Trp List: छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये टीआरपीची शर्यत सुरू आहे. आता कलर्सने झी मराठीला टीआरपीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये टीआरपीची जोरदार शर्यत पाहायला मिळते. टीआरपीमध्ये राहण्यासाठी वाहिन्या निरनिराळे प्रयत्न करताना दिसतात. कलर्स मराठी, झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळतेय. गेल्या काही महिन्यात कलर्स मराठी आणि झी मराठीवर अनेक नव्या मालिका सुरू करण्यात आल्या. आता केदार शिंदे यांनी कलर्स वाहिनीचं क्रिएटिव्ह हेड पद स्वतःकडे घेतल्यापासून वाहिनीमध्ये अनेक बदलही पाहायला मिळाले. आता कलर्स वाहिनीने आणखी एक इतिहास रचला आहे. 'बिग बॉस मराठी ५' हा कार्यक्रम आता सर्वाधिक टीआरपी मिळवणारा कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे.

कलर्सने झीला दिला जोराचा धक्का

गेल्या आठवड्यात कलर्स वाहिनीने झी वाहिनीला टीआरपीच्या शर्यतीत मागे टाकलं आहे. छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त टीआरपी मिळवणाऱ्या वाहिन्यांमध्ये टॉप ५ मध्ये तीन मराठी वाहिन्यांचा समावेश आहे. यात स्टार प्रवाह प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कलर्स मराठी आहे. तिसऱ्या क्रमांकावर सोनी सब आहे आणि चौथ्या क्रमांकावर झी मराठी आहे. यापूर्वी झी मराठी दुसऱ्या स्थानावर होतं. आणि कलर्स चौथ्या स्थानावर होतं. मात्र आता हे चित्र बदललं आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा वाहिनीला चांगलाच फायदा झाला आहे.

यासोबतच 'बिग बॉस मराठीच्या या सीझनने देखील त्यांचा रेकॉर्ड तोडला आहे. यापूर्वी बिग बॉस मराठीने ४ चा रेटिंग मिळवत कथाबाह्य कार्यक्रमामध्ये पहिलं स्थान मिळवलं होतं. मात्र आता बिग बॉस मराठीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे. या सीझनला सर्वाधिक ५ चा रेटिंग मिळाला आहे. ५ चं रेटिंग मिळवणारा बिग बॉस मराठी हा पहिला कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता बिग बॉस संपल्यानंतर कलर्स त्याचा हा रेटिंग पॉईंट टिकवून ठेवू शकेल का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT