Colors marathi new serial esakal
Premier

ती परत येतेय! कलर्स मराठीवर परतणार वाहिनीची धडाकेबाज नायिका; नेटकऱ्यांनी डोळे पाहूनच सांगितलं नाव

Colors Marathi Actress Comeback On Channel: लवकरच कलर्स मराठीवर एक जुनी नायिका परतणार आहे. तिचा एक व्हिडिओ कलर्स मराठीने शेअर केला आहे.

Payal Naik

Colors Marathi: छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही मालिका कायमच्या मनात घर करतात. त्यात दिसणारे कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात. ते जणू आपल्या घराचा भाग आहेत असंच प्रेक्षक समजतात. हे कलाकार कुठेही दिसले तरी प्रेक्षक त्यांना लगेच ओळखतात. अशीच एक अभिनेत्री कलर्स मराठीवर पुन्हा परतणार आहे. तिची आधीही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून तिने आपला ठसा उमटवला होता. कलर्स वाहिनीतर्फे एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय ज्यावरून प्रेक्षकांनी तिला ओळखलं आहे. आता एका नवीन मालिकेत ती दिसणार आहे कोण आहे ही अभिनेत्री?

कलर्स वाहिनी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतेय. वाहिनीवर नुकतीच 'लय लय आवडतेस तू मला' आणि 'आई तुळजाभवानी' या मालिका सुरू झाल्या. त्यात 'पिंगा गं पोरी' आणि 'अशोक मा मा' या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या 'अशोक मामा' या मालिकेत कलर्स वरील जुनी नायिका पुन्हा दिसणार आहे. कलर्स वाहिनीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिचे डोळे दिसत आहेत. तिच्या डोळ्यांवरून नेटकऱ्यांनी तिला ओळखलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून रसिका वाखरकर आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. रसिका यापूर्वी 'पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत ती सावीच्या भूमिकेत दिसली होती.

या मालिकेतील अर्जुन आणि सावीची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. मात्र या मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता रसिका 'अशोक मा मा' या मालिकेत अशोक सराफ यांच्यासोबत दिसणारा आहे असा अंदाज लावण्यात येतोय. तर प्रेक्षकही 'अशोक मा मा' या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातून काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT