colors marathi news serial  esakal
Premier

कलर्स मराठी इस ऑन फायर! बिग बॉस बंद होताच आणखी एक नवी मालिका येणार भेटीला; वाचा अभिनेत्रींची नावं

Colors Marathi News Serial Pinga Ga Pori Pinga : छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर आणखी एक नवी मालिका सुरू होणार आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या कार्यक्रमाने कलर्स मराठीच्या सर्वच कार्यक्रमाच्या टीआरपीचे रेकॉर्ड मोडले. इतकंच नाही यापूर्वीच्या सीझनपेक्षाही सगळ्यात जास्त टीआरपी या सीझनला मिळाला आहे. मात्र आता बिग बॉसने निरोप घेतल्यावर कलर्स मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. यापूर्वी कलर्सने तब्बल चार चार मालिकांची घोषणा केली होती. आता त्यात आणखी एका मालिकेची भर पडलीये. कलर्सच्या नव्या मालिकेचा एक प्रोमो आता व्हायरल झालाय. या मालिकेचं नाव आहे पिंगा गं पोरी पिंगा'.

काय आहे मालिकेचा विषय?

ही मालिका अतिशय वेगळी दिसतेय. या मालिकेत मुलींच्या मैत्रीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. कालच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झालाय. या प्रोमोमध्ये एक गावाकडून आलेली मुलगी एका मोठ्याला टॉवरमध्ये प्रवेश करते. जेव्हा तिची मैत्रीण दरवाजा उघडते तेव्हा शेजारची बाई म्हणते, "अजून एक नवीन एन्ट्री झाली वाटतं. दिवसभर नुसता खिदळण्याचा आवाज येत असतो.' त्यावर ती मैत्रीण तिला ओवाळून घरात घेते. तर ही मुलगी शेजारची बाई काय म्हणत होती हे सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावर त्या घरात असलेल्या आणखी चार मैत्रिणी तिला या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला सांगतात. त्या म्हणतात तू चिल कर.'

ही आहे मालिकेची स्टारकास्ट

पुढे पाचही जणी एकमेकींच्या हातावर हात ठेवतात. आपल्या मैत्रीची रंगत न्यारी, जगात भारी आपलीच यारी! असं म्हणतात. या मालिकेत शाश्वती पिंपळीकर, ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, प्राजक्ता परब आणि विदिशा म्हसकर या पाच अभिनेत्री दिसत आहेत. या मालिकेची रिलीज डेट अजून समोर आली नसली तरी मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता ही मालिका कधीपासून सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी भावे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT