bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: ठरलं! बिग बॉस मराठीच्या घरात जाणार हा लोकप्रिय गायक, ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो समोर, वाचा नाव

Bigg Boss Marathi 5 First Contestant: बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये नक्की कोण कोण दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता त्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी'. कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाने सगळ्यांना वेड लावलंय. बिग बॉस मराठीचे मागील चार सीझन जोरदार गाजले. आता बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळेस महेश मांजरेकरांऐवजी अभिनेता रितेश देशमुख कार्यक्रम होस्ट करणार आहे. २८ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले होणार आहे. मात्र त्यापूर्वी वाहिनीने ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील पहिल्या फिक्स सदस्याची झलक दाखवली आहे. हा एक गायक आहे. मात्र या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याचं नावही सांगितलं आहे.

गेले कित्येक दिवस प्रेक्षक या सीझनमध्ये नेमके कोणकोणते कलाकार दिसणार याचा अंदाज लावत होते. आता या घरात जाणाऱ्या एका सदस्याचा चेहरा समोर आला आहे. कलर्स वाहिनीने ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये एक गायक हातात माईक घेऊन गाणं गाताना दिसतोय. तो स्वप्नील बांदोडकरचं राधा ही बावरी गाणं गाताना दिसतोय. तर या प्रोमोवर वाहिनीने त्याचा उल्लेख सुरांचा बादशाह असा केला आहे. आता त्याच्या देहबोलीवरून नेटकऱ्यांनी त्याचं नाव सांगितलं आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसून लोकप्रिय गायक अभिजित सावंत आहे.

अभिजितने आपल्या सुरांच्या जोरावर संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. त्याने 'इंडियन आयडल' चा पहिला सीझन जिंकला होता. त्याचा आवाज आजही अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये ऐकू येतो. आता चाहत्यांचा लाडका अभिजित बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. मोहोब्बत्ते लुटाउंगा म्हणत तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर त्याला बिग बॉसच्या घरात पाहण्यातही चाहते उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता ताणली गेली आहे. तर अभिनेता शुभंकर तावडे यानेही एक स्टोरी शेअर करत आपण बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची हिंट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT