colors marathi serial off air  sakal
Premier

Colors Serial Off Air: 'बिग बॉस मराठी ५' येणार पण कलर्सवरील दोन लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट

colors Marathi Serial Going Off Air: लवकरच 'बिग बॉस मराठी ५' सुरू होणार आहे. मात्र त्यासाठी दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जवळच्या ठरतात. या मालिकांमधून घराघरात पोहोचलेले कलाकार कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. मात्र कथा संपली की या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. कधी कथानकामुळे तर कधी ढासळलेल्या टीआरपीमुळे या मालिका बंद करण्याचा निर्णय प्रोडक्शन हाउसकडून घेण्यात येतो. आता अशाच दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. कलर्स मराठीवरील दोन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. कलर्सवर नव्याने सुरू होणाऱ्या 'बिग बॉस मराठी सीझन ५' मुळे या दोन मालिका बंद होणार आहेत.

rama raghav

येत्या २८ जुलै पासून कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी ५' पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी दोन मालिका बंद करण्यात येणार आहेत. त्यातील पहिली मालिका म्हणजे 'रमा राघव'. रमा आणि राघव ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. पौरोहित्य करणारा राघव आणि त्याला साथ देणारी रमा प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र आता ही मालिका निरोप घेणार आहे. मालिकेच्या शेवटी पूजा वाहिनीच्या मृत्यूचा छडा ते दोघे लावणार आहेत. ही मालिका रात्री ९. ३० वाजता प्रक्षेपित होत होती.

या यादीतील दुसरी मालिका आहे 'पिरतीचा वणवा उरी पेटला'. या मालिकेतील बिनधास्त सावी आणि दमदार अर्जुन ही जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेतील कलाकारांनी अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेतली. मामांनीदेखील आपण ही मालिका दररोज पाहत असल्याचं सांगितलं होतं. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका १० वाजता प्रक्षेपित होत होती. आता या दोन्ही मालिका निरोप घेणार आहेत. २७ जुलै रोजी या मालिकांचा शेवटचा प्रक्षेपित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT