Commander Karan Saxena Esakal
Premier

Commander Karan Saxena OTT Release: 'या' दिवशी कमांडर करण येणार प्रेक्षकांच्या भेटीस ! कधी ? कुठे ? जाणून घ्या

Commander Karan Saxena: अभिनेता गुरमीत चौधरीची आगामी वेबसिरीज कमांडर करण सक्सेना सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया ही वेबसिरीज कधी रिलीज होतेय.

सकाळ डिजिटल टीम

Gurmeet Chaudhary: अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) सध्या त्याच्या आगामी कमांडर करण सक्सेना (Commander Karan Saxena) या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. अक्शन आणि थ्रिलर प्रकारातील ही वेबसिरीज सध्या व्हायरल झालेल्या बिहाइंड द सीनमुळे चर्चेत असून जुलै २०२४ मध्ये ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या वेबसिरीजची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली.

रिलीज डेट जाहीर

बहुप्रतीक्षित कमांडर करण सक्सेना या वेबसीरिजची रिलीज डेट नुकतीच हॉट स्टारने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केली. 'टीम इंडियासाठी कमांडर करण सक्सेना येतोय' असं कॅप्शन देत ८ जुलैला ही वेबसिरीज रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. डिझने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज रिलीज होणार आहे.

वेबसीरिजची कास्ट

या वेबसिरीजमध्ये गुरमीत चौधरी बरोबर मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे स्क्रीन शेअर करणार आहे. ऋताचा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट असून या प्रोजेक्टद्वारे ती हिंदी वेबविश्वात पदार्पण करतेय. ती या वेबसिरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचं म्हंटलं जातंय. या व्यतिरिक्त अभिनेता इकबाल खान, अमित बहल, कृष्णा बिश्त, जतीन वागळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सिरीजचं कथानक

या वेब सिरींजची कथा रॉ चा एजंट कमांडर करण सक्सेनाभोवती फिरते. पाकिस्तानी सैन्याने भारतातील सामान्य लोक आणि सैन्य यांच्यावर हल्ला करण्याचं आव्हान दिल्यावर करण हे आव्हान कसं मोडून काढतो आणि त्यासाठी त्याला किती संकटांचा सामना करावा लागतो याची गोष्ट या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान आणि भारतातील वादावर ही देशभक्तीपर सिरीज आधारित असून या सिरीजमध्ये अनेक समस्यांवर भाष्य करण्यात येणार आहे.

'या' पुस्तकावर आधारित वेबसिरीज

अमित खान यांच्या कमांडर करण सक्सेना या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारित असून जतीन वागळे यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे तर कृष्णन अय्यर आणि राजेश्वरी नायर यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT