Bigg Boss Marathi Esakal
Premier

Bigg Boss Marathi Day 2 : भांडी घासण्यावरून वादाची ठिणगी; कोकण हार्टेड गर्लवर भडकली निकी, काय घडलं नेमकं ?

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये दुसऱ्याच दिवशी घरात वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Day 2 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ५ हा सीजन पहिल्या दिवसापासून रंगायला सुरुवात झालीये. घरात कुठे प्रेमप्रकरण सुरु झालंय तर कुठे वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीतील सदस्यांचा घरातील दुसरा दिवस सुरु नाही झाला तर लगेच घरात वाद-विवाद सुरु झाले आहेत.

घरात आलेली फॉरेनर सदस्य इरिना रुडोकावाशी संवाद साधणं इतर सदस्यांना कठीण झालं आहे. त्यातच ड्युटीमुळे यइरिना आणि इतर सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झालीये. बिग बॉस मराठीच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, निखिल इरिनाला ती आज सुरजबरोबर भांड्यांची ड्युटी करेल का ? असं विचारतो तेव्हा इरिना सगळी भांडी ती एकटीने घासणार नाही असं सांगते. तेव्हा सगळेजण तिला सूरज तिच्या मदतीला आहे असं सांगतात.

निखिल तिला सूरज ने काम सुद्धा सुरु केलंय असं म्हणतो. तेव्हा इरिना तिला करायला हरकत नाही पण ती स्वतःचीच भांडी घासेन असं म्हणते. तेव्हा अंकिताला तिला आपलं बोलणं समजत नाहीये असं कळत. तेव्हा ती तिला अजून माणसं हवी आहेत का ? असं विचारते तर निखिलही तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण इरिना नाखूष आहे असं पाहायला मिळालं.

तर दुसरीकडे घरातील सदस्य निकी तांबोळी आणि अंकिता प्रभू वालावलकरमध्ये लवकरच जोरदार वाद होणार आहे. निकी जान्हवीला सांगताना पाहायला मिळाली कि, आज तिला निखिल म्हणाला जर इरिनासाठी बिग बॉस सॉर ब्रेड पाठवू शकतात तर तुझ्यासाठीही तुझ्या डाएटचं सामान पाठवतील. निखिल हे तिला सांगत असताना अंकिताने तोंड वाकडं केल्याचं निकीने पाहिलं आणि तिने जान्हवीला यावरून ती लवकरच अंकिताशी भांडण करणार आहे असं सांगत असल्याचं पाहायला मिळाली.

घरातील ड्युटीवरून सदस्य पहिल्याच आठवड्यात एकमेकांशी वाद घालणार का ? निकी आणि अंकितामध्ये जेवणावरून भांडण होणार का ? हे लवकरच बिग बॉस मराठीच्या आगामी भागात पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT