Virat Kohli Esakal
Premier

Virat Kohli & Shah Rukh Khan : सगळीकडे किंग कोहलीचा बोलबाला ! जाहिरात क्षेत्रात विराट ठरला आघाडीचा सेलिब्रिटी ; शाहरुखलाही टाकलं मागे

Virat & Shah Rukh : क्रिकेटर विराट कोहली हा भारतातील सगळ्यात जास्त ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी ठरला असून त्याने सुपरस्टार शाहरुख खानला देखील मागे टाकलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virat & Shah Rukh Khan Brand Value : क्रिकेट जगतातील सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली सध्या क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रमांमध्ये आघाडीवर आहे पण आता फक्त क्रिकेटचं नाही तर जाहिरात जगतातही विराटने अव्वल स्थान पटकावलं आहे. याबरोबरच विराटने सगळ्यात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रिटीजच्या यादीतही पहिलं स्थान पटकावलं आहे. या यादीत विराटने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि रणवीर सिंहला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ

भारतातील सगळ्यात महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत आपला स्थान वाढवत, कोहलीने वर्षभरात त्याच्या एकूण ब्रँड मूल्यामध्ये सुमारे 29 टक्क्यांनी वाढ केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 सीजन कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) मधील सहभाग प्रभावी होता. या लीगमध्ये प्रतिष्ठित ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार T20 विश्वचषक स्पर्धेत सामील झाला आहे.

'या' विक्रमांमध्येही अव्वल

कोहलीने गेल्या वर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) विश्वचषक फलंदाजी यादीतही वर्चस्व गाजवलं. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 35 वर्षीय खेळाडूने फलंदाजीतील अनेक विक्रम मोडीत काढले. या बॅटिंग आयकॉनने ICC ODI Player of the Year चा पुरस्कार जिंकला आणि ICC Men's ODI Team of the Year साठी देखील विराटची निवड झाली.

विराटची ब्रँड व्हॅल्यू नेमकी किती ?

क्रोल या कॅन्सल्टंसी फर्मच्या रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २२७.९ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे तर अभिनेता रणवीर सिंहची ब्रँड व्हॅल्यू २०३.१ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे तर किंग खान शाहरुखने १२०.७ मिलियन यूएस डी डॉलर कमवत या यादीत तिसरं स्थान पक्कं केआहे. यात धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचीही नावं आहेत. एम एस धोनीची सध्या ब्रँड व्हॅल्यू ९५.८ मिलियन यूएस डॉलर असून सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू ९१.३ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: ठाकरे ब्रँण्डला नागरिकांनी नाकारले आहे- मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT