Dalljiet Kaur  Esakal
Premier

Dalljiet Kaur : "तुझं सामान घेऊन जा नाहीतर..."; दलजितला नवऱ्याने पाठवली कायदेशीर नोटीस

Dalljiet's husband sent her legal notice : अभिनेत्री दलजित कौरला तिचा नवरा निखिल पटेलने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

९Nikhil Patel on Dalljeit Kaur : गेल्या काही काळापासून अभिनेत्री दलजित कौर (Dalljeit Kaur) तिच्या पतीशी सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. दलजितने निखिल पटेल (Nikhil Patel) या बिझनेसनशी दुसरं लग्न केलं होतं पण तिचं हे लग्नही मोडलं असून तिच्या नवऱ्याने त्यांच्यात आता कोणतंही नातं उरलं नसल्याचं स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर दलजितने पोस्टच्या माध्यमातून तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याची हिंट दिली होती तर निखिलने ई टाइम्सला मुलाखत देत त्यांचं नातं संपलं असल्याचं जाहीर केलं होतं. या सगळ्या गोष्टीची चर्चा असतानाच निखिलने दलजितला कायदेशीर नोटीस पाठवलीये.

निखिलने पाठवली कायदेशीर नोटीस

निखिलने पाठवलेल्या नोटीसनुसार भारतीय दंड संहिता, सूचना प्रौद्योगिकी अधिनियम २००० (भारत) आणि यौन अपराधांपासून मुलांचं संरक्षण अधिनियम २०१० च्या नुसार, सोशल मीडियावर दलजितने त्यांच्यावर केलेला विवाहबाह्य संबंधाचा आरोप चुकीचा आहे आणि दलजितच्या या आरोपांमुळे निखिल कायदेशीर कारवाईत अडकू शकतो.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, "जगात राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून हे खूप त्रासदायक आहे कि भारतात आणि जगभरातील ऑनलाईन प्रोटेक्शन कायद्यांची कमी असल्यामुळे लोकं याचा फायदा घेतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही पोस्ट करतात. यामुळे अनेक महिला आणि निरागस मुलंही अडचणीत येऊ शकतात. या घटनेत सहभागी असणाऱ्या लोकांचे व्हिडीओज आणि फोटो त्यांच्या परवानगीशिवाय शेअर करणं बेजबाबदारपणाचं लक्षण आहे." असं निखिलने नोटीसमध्ये सांगितलं आहे.

दिली कायदेशीर कारवाईची धमकी

रिपोर्टनुसार, निखिलने दलजितला हे सुद्धा सांगितलंय कि जूनपर्यंत तिने तिचं केनियामधील घरात असलेलं सामान घेऊन जावं नाहीतर तो तिथे असलेल्या एका ट्रस्टला दान करेल. निखिलच्या टीमने हे ही सांगितलंय कि, यापुढे तो कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करणार नाही आणि दलजितने हे सुरु ठेवलं तर तिच्यावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

फेब्रुवारीपासून होती घटस्फोटाची चर्चा

काही महिन्यांपूर्वीच दलजित तिच्या मुलासोत भारतात परत आली आणि काही काळाने त्या दोघांनीही सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आणि एकमेकांना अनफॉलो केलं. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या.

आता काही दिवसांपूर्वीच दलजितने तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT