danka hari namacha movie  sakal
Premier

विठुरायाच्या झाकलेल्या रुपामागचं कारण उघड; 'डंका हरी नामाचा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; झळकणार हे कलाकार

Danka Hari Namacha: 'डंका हरी नामाचा' या चित्रपटाचा टीझर आता समोर आला आहे. त्यात चित्रपटातील कलाकारही दिसत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेले काही महिने झाकलेल्या विठुरायाच्या मूर्तीचा एक गूढ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा फोटो 'डंका हरी नामाचा' या चित्रपटातील होता. आता त्या फोटोमागील कारण समोर आलं आहे. नुकताच या चित्रपटाचं टीझर समोर आला आहे. यात चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूकदेखील समोर आले आहेत. या टीझरमध्ये ‘चला आपण आणू आपल्या विठुरायाला’... असं अभिनेता अनिकेत विश्वासराव बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतं? आणि हा शोध नेमका कुठे संपतो ? याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझरवरून निर्माण झाली आहे.

आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी एक आनंद सोहळाच... पंढरीच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात, त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अभिनेता अनिकेत विश्वासराव हा मात्र या विठूरायाचा शोध घेतोय. हा शोध तो कशासाठी घेतोय? हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे

अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार,किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव या कलाकारांची झलक सुद्धा या टीझरमध्ये पहायला मिळतेय.

‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतो, या चित्रपटात मी जना ही व्यक्तिरेखा साकारतोय. भक्तीत लीन होणारा, श्रद्धाळू, बापासाठीअगदी श्रावणबाळ असलेला जना परंपरागत विठ्ठल मंदिर वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे. १९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर,अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT