PRABHAS AND SANJAY DUTT IN DA RAJA SAAB TEASER esakal
Premier

हॉरर, सस्पेन्स, थ्रीलर...'द राजा साब'टीझर पाहिलात का? संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

PRABHAS AND SANJAY DUTT IN DA RAJA SAAB TEASER: बहुचर्चित चित्रपट 'द राजा साब'चा टीझर प्रदर्शित झालाय. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा समोर आलीय.

Apurva Kulkarni

'द राजा साब' सिनेमाची उत्सुकता सर्वांना अनेक दिवसांपासून लागली होती. या चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. प्रभासचे आदिपुरुष, कल्की हे चित्रपट हवे तसे चालले नाहीत. त्यामुळे आता द राजा साब चित्रपटात प्रभास आपल्या अभिनयाची छाप पाडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'द राजा साब' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये प्रभाससोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पहायला मिळाला होता. परंतु टीझरमधून प्रभासपेक्षा संजय दत्तने लाइमलाइट लुटलीय. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

प्रभासच्या आगामी 'द राजा साब' सिनेमाच्या टीझरमध्ये प्रभास दिसतोय. अशातच प्रभास एका मुलीच्या प्रमात पडतो. पुढे टीझरमध्ये मोठा वाडा दाखवण्यात आलाय. या वाड्यात संजय दत्त आक्रमक भूमिकेत दाखवण्यात आलाय. तसंच पुर्वजांचा या वाड्यामध्ये संजय दत्तचा अनोखा इतिहास असतो.

पुढे टिझरमध्ये प्रभास वाड्यात येते. त्याच वेळी त्याची गाठ ही संजय दत्तशी पडते. या वाड्यातील हॉरर आणि संजय दत्तचं रहस्य काय हे चित्रपट पाहिल्यानंतर कळणार आहे. हा चित्रपट हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक असणार आहे. मालिवका मोहनन, रिद्धी कुमार, निधी अग्रवाल सुद्धा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

'द राजा साब' हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हॉरर, सस्पेन्स आणि रोमान्स पहायला मिळणार आहे. या सिनेमातील संजय दत्तांचा त्या वाड्याशी आणि प्रभासशी काय संबंध आहे. हे पाहण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT