Actor Gurucharan Singh staged his own disappearance 
Premier

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Actor Gurucharan Singh staged his own disappearance : अभिनेता गुरुचरण सिंहने बेपत्ता स्वतःच्या बेपत्ता होण्याचा कट रचलाय असा दिल्ली पोलिसांना संशय आहे. या संदर्भात महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gurucharan Singh disappearance case : 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्याबाबत अदयाप काहीच माहिती मिळाली नाहीये. त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पोलीस गुरुचरणचा शोध घेत आहेत पण त्याला शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.

२६ एप्रिलपासून गुरुचरणचा शोध सुरु असून त्याच्याविषयीची काहीच माहिती हाती न लागल्यामुळे त्याने बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा असाही संशय पोलिसांना आहे. न्यूज १८ने त्यांच्या दिल्लीतील पोलीस सूत्रांची मदत घेत याबाबत बातमी दिली.

"त्याने त्याचा फोन पालम परिसरातच सोडला आहे. आम्ही त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न करतोय पण त्याचा शोध घेणं खूप कठीण जातंय. कारण त्याचा फोन त्याच्यापाशी नाही. आम्हाला आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे ज्याच्यात तो एका ई रिक्षेतून दुसऱ्या रिक्षेत जाताना दिसतोय. असं वाटतंय कि, त्याने ही योजना आधीच बनवली होती आणि आता तो दिल्लीच्या बाहेर गेलाय. " असं सूत्रं म्हणाले.

गुरुचरण अखेरचा केव्हा दिसला?

२२ एप्रिल २०२४ ला गुरुचरणला त्याच्या कुटूंबाने अखेरचं पाहिलं होतं. तो सकाळीच ११ वाजता मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. रात्री ८:३० वाजता त्याचं विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणार होतं पण तो विमानतळावर पोहोचलाच नाही.

पोलिसांच्या हाती जे सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे त्यानुसार तो रात्री ९:१५ च्या सुमारास पालम परिसरात त्याची बॅग पाठीवर घेऊन रस्ता ओलांडताना दिसला होता. त्यानंतर अद्याप त्याचा काहीही पत्ता लागला नाहीये. त्याने दोन दिवस काहीच संपर्क न केल्याने त्याच्या वडिलांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली. गुरुचरणचं वय ५० वर्षं असून तो मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याचं घरच्यांचं म्हणणं आहे.

आई-वडिलांसाठी सोडली मालिका

गुरुचरण गेली अनेक वर्ष सब टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होता. या मालिकेत त्याने साकारलेली सोढी या मॅकेनिकची भूमिका खूप गाजली होती पण २०२० मध्ये त्याने ही मालिका त्याच्या आई-वडिलांसाठी सोडली. त्याचे आई-वडील सतत आजारी असतात आणि त्यांची सेवा करता यावी म्हणून तो मालिका सोडून दिल्लीत स्थायिक झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT