Devara sakal
Premier

Devara Fear Song: 'देवरा' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज; फिअर साँगमध्ये दिसला ज्युनिअर एनटीआरचा स्वॅग

Jr NTR: 'देवरा' या चित्रपटातील पहिले गाणं काल (19 मे) ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आले आहे.

priyanka kulkarni

Devara First Song: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या (Jr NTR) 'देवारा' (Devara) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील काम करणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणं काल (19 मे) ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यातील ज्युनियर एनटीआरच्या लूकनं आणि त्याच्या स्वॅगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

देवरा चित्रपटातील 'फिअर' नावाचे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणं जवान संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे गीतकार रामजोगय्या शास्त्री यांचे आहेत आणि अनिरुद्धने हे गाणे गायले आहे. गाण्यामध्ये चित्रपटातील ज्युनियर एनटीआरच्या पात्राची ओळख करून दिली आहे. या व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआरचे काही अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत.

करण जोहरने इंस्टाग्रामवर गाणे शेअर करुन लिहिलं, "सेलिब्रेट करण्यासाठी लाटा पूर्ण ताकदीने आल्या आहेत! फिअर साँग रिलीज झालं आहे."

कधी रिलीज होणार देवरा?

देवरा या चित्रपटातून जान्हवी कपूर तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. काही महिन्यांपूर्वी, जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर देवरा चित्रपटाच्या शूटमधील एक BTS फोटो शेअर केला होता.देवरा या चित्रपटात प्रकाश राज, श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको आणि सैफ अली खान यांच्या भूमिका देखील आहेत. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT