Devdatta Nage SAKAL
Premier

Devdatta Nage: "आज तू असतास तर..."; "जय मल्हार" मालिकेतील सह कलाकाराबद्दल देवदत्त नागेची भावनिक पोस्ट

देवदत्त नागेनं (Devdatta Nage) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं अभिनेते अतुल अभ्यंकर (Atul Abhyankar) यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

priyanka kulkarni

Jai Malhar: छोट्या पडद्यावरील "जय मल्हार" (Jai Malhar) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आज या मालिकेला दहा वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं "जय मल्हार" या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागेनं (Devdatta Nage) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं अभिनेते अतुल अभ्यंकर (Atul Abhyankar) यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

देवदत्त नागेची पोस्ट

देवदत्त नागेनं “जय मल्हार” या मालिकेतील एका सीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं, "प्रति... अतुल अभ्यंकर, अतुल... आज 18 मे 2024! 18 मे 2014, 7 वाजता Zee मराठी वर आपल्या “जय मल्हार” चा पहिला Episode प्रक्षेपित झाला आणि श्री खंडेराया चरणी आपली सेवा रुजू झाली! "

Jai Malhar

"आज तुझी प्रकर्षाने आठवण येत आहे रे...देवयानी मालिकेमध्ये आपली ओळख आणि लगेच ऋणानुबंध' तुझी अचानक एग्झीट अतिशय दुःखदायी होती! पण तरीही आपल्या सेट वर, आपल्या Make Up Room मध्ये तुझं अस्तित्व सतत जाणवत होतं ! अजूनही श्री क्षेत्र जेजुरीला, जेव्हा श्री हेगडी प्रधान ह्यांचे दर्शन घेतो तेव्हा.... तुझाच चेहरा समोर असतो रे, अरे आज तू असतास तर आपल्या "जय मल्हार" मालिकेच्या दशक पूर्तीला सोन्याची झालर असती! अतुल... जय मल्हारची ही दशकपुर्ती तुला समर्पित आहे, जय मल्हार!", असंही देवदत्तनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने अतुल अभ्यंकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.

“जय मल्हार” या मालिकेत सुरभी हांडे,ईशा केसकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: बिहारमधील गोंधळानंतर आता निवडणूक आयोगाने ‘SIR’बाबत घेतला मोठा निर्णय!

IND vs ENG 4th Test: इंग्लंडचे 'Root' भक्कम! जो रूटची १५० धावांची खेळी, अनेक विक्रम अन् भारताविरुद्ध मोठी आघाडी

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT