dhamaveer 2 box office collection  esakal
Premier

'धर्मवीर'समोर फ्लॉप ठरला 'धर्मवीर २'; नाही चालली चित्रपटाची जादू; बॉक्स ऑफिसवर एकूण किती केलं कलेक्शन? वाचा आकडा

Dharmaveer 2 Total Box Office Collection: मराठी अभिनेता प्रसाद ओक याचा 'धर्मवीर २' नुकताच प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाने म्हणावी तशी कमाई केलेली नाही.

Payal Naik

मराठी इंडस्ट्रीत यावर्षी अनेक चित्रपटांचे सिक्वेल प्रदर्शित झाले या सगळ्या चित्रपटात प्रेक्षक 'धर्मवीर २' ची आतुरतेने वाट पाहत होते. २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर २' ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होती. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकला नाही. सुरुवातीला दमदार कमाई करणारा हा चित्रपट पुढे मात्र प्रचंड रेंगाळला. 'धर्मवीर' सुपरहिट ठरला. त्याप्रमाणे 'धर्मवीर २' कडूनही प्रेक्षकांना अपेक्षा होती मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी 'धर्मवीर' च्या मानाने हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यास फेल ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केलीये हे जाणून घेऊया.

किती होती 'धर्मवीर' ची कमाई?

'धर्मवीर'मध्ये आनंद दोघे यांची कथा दाखवण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटावर भरभरून प्रेम केलं. या चित्रपटाने तब्बल २५ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

किती आहे १९ दिवसांची कमाई

प्रसाद ओकच्या 'धर्मवीर २'कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती. मात्र सुरुवातीला सुसाट सुटलेला हा चित्रपट पुढे थंड पडला. या चित्रपटाने १९ दिवसात केवळ १५ कोटी २१ लाखांची कमाई केली आहे. हा चित्रपट हिट होण्यासाठी १६ कोटींचा आकडा गाठण्याची गरज आहे मात्र त्यासाठी आणखी ८७ लाखांची कमाई होणं गरजेचं आहे. मात्र गेल्या काही दिवसात चित्रपट केवळ ५ ते ३ लाखांपर्यंतची कमाई करताना दिसत आहे. त्यामुळे हा आकडा पार करणं अवघड आहे.

किती आहे चित्रपटाचं बजेट

हा चित्रोत ८ कोटींच्या बजेट मध्ये बनला आहे. चित्रपटाला आतापर्यंत ७ कोटींचा फायदा झाला आहे. मात्र असं असलं तरी हा चित्रपट 'धर्मवीर' समोर फ्लॉप ठरला असं म्हणायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: स्मृती मानधनाचं पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमण, शतक हुकलं, पण रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Boat Accident: गुरांसाठी चारा आणण्यास १४ गावकरी गेले; पण परतताना बोट उलटली अन्...; होत्याचं नव्हतं झालं, घटनेनं हळहळ

Short film Oscar: कराड ‘कृष्णा मेडिकल’च्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर; देहदानावरील लघुपटाला ‘ऑस्कर’चे कोंदण

DMart Sale : वीकेंड संपताच डीमार्टमध्ये नवा सेल; 'या' वस्तू झाल्या आणखी स्वस्त, 70% पेक्षा जास्त डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: विरार रेल्वे स्थानकाजवळ विद्युत पुरवठा बंद झाल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत

SCROLL FOR NEXT