Dharmaveer 2  Esakal
Premier

Dharmaveer 2: 'धर्मवीर - २' ची नवी रिलीज डेट समोर, अजून दीड महिना प्रेक्षकांना पाहावी लागणार वाट, वाचा नवी तारीख

Dhamaveer 2 New Release Date: 'धर्मवीर - २' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.

Payal Naik

Dhamaveer 2 Release Date: लोकप्रिय शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर - २' हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. प्रेक्षक या चित्रोताची आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटातून मिळणार आहेत. मात्र महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ठरलेल्या दिवशी प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गाव पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून 'धर्मवीर २' ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकहीं करण्यात आले होते. आता या चित्रपटाची नवीन तारीख समोर आली आहे. अजून दीड महिन्यानंतर २७ सप्टेंबरला 'धर्मवीर २' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती ,अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते ,परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. 'धर्मवीर २' हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

Palghar News: डहाणूतील रस्ता रुंदीकरणासाठी ७५९ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Nashik Crime: बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश! सीबीआयची कारवाई; एक कोटीहून अधिक रोकड, सोने जप्त

Heart Surgery: 'जन्म- मरणाचे हेलकावे खाणाऱ्या रविनाला लाभले नवे आयुष्य'; गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी, शिक्षकांची सहृदयता

SCROLL FOR NEXT