Sai pallavi  sakal
Premier

Sai Pallavi: दोन मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी? चाहत्यांनाही बसला धक्का

Sai Pallavi Dating Rumours: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दोन मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

Payal Naik

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. दक्षिणेकडेच नाही तर बॉलिवूडमध्येही तिचे प्रचंड चाहते आहेत. 'फिदा' या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. ती लवकरच रणबीर कपूरसोबत 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्यापूर्वी अभिनेत्रीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी एका विवाहित अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या बातमीमुळे आता साई पल्लवीचे चाहते भलतेच चिंतेत पडले आहेत.

तामिळ वेबसाईट्सनी ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, साई पल्लवी एका विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इतकंच नाही तर त्याला दोन मुलंही आहेत. ही बातमी किती खोटी किती खरी याबद्दल कोणतीही माहिती नाही मात्र यामुळे साईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा या गोष्टीवर मुळीच विश्वास बसत नाहीये. ही केवळ एक अफवा असल्याचं तिच्या फॅन क्लबचं म्हणणं आहे. मात्र असं असलं तरी साई पल्लवीच्या टीमकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या बातमीवर अभिनेत्रीकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

इतकंच नाही तर तिच्या कुटुंबातील कुणीही याबद्दल भाष्य केलेलं नाही. चाहते आता अभिनेत्रीच्या उत्तराची वाट पाहत आहेत. हे सगळं खोटं आहे असं म्हणत चाहते स्वतःच्या मनाची समजूत घालताना दिसत आहेत. दुसरीकडे साईने तिच्या अभिनय कौश्यल्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तिने तेलगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटात काम केलं आहे. तिने सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र आता या बातमीमुळे तिचे चाहते दुखावले गेले आहेत. ते साईच्या उत्तराची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT