Premier

Dilip Kumar : ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्या आलिशान बंगल्याची झाली विक्री ; इतक्या करोडमध्ये झाला व्यवहार

Dilip Kumar Sea Facing Bunglow get sold : ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचा सुप्रसिद्ध पाली हिल परिसरातील बंगल्याचा व्यवहार झाला असून यात खूप मोठी गुंतवणुक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रसिद्ध पाली हिल येथी समुद्र किनाऱ्याजवळील बंगला विकला गेला आहे. एका बड्या कंपनीने या जागेत गुंतवणूक केली असून २०२३ साली या ठिकाणी एक आलिशान इमारत उभी राहणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता या प्रकल्पात एक मोठी गुंतवणूक झाल्याची बातमी समोर येते आहे. ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने या सी फेसिंग बिल्डिंग १७२ करोड रुपयांची गुंतवणूक केल्याचं म्हंटलं जातंय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा आकडा १५५ करोड रुपये इतका आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इमारतीच्या नवव्या, दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर 9527 चौरस फूट कार्पेट एरियावर ही अपार्टमेंट उभारण्यात येणार आहे. त्याची किंमत तब्बल 155 कोटी ते १७२ कोटी रुपयांच्या घरात आहे. या ट्रिपलेक्सची विक्री 1.62 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने झाली असून या परिसरातील प्रॉपर्टीमध्ये हा सर्वाधिक किंमतीचा करार आहे, असं म्हटलं जातंय. यासाठी 9.3 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क देण्यात आले आहेत.

‘द लेजंड’ या नावाने आशर ग्रुपकडून हा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येत असून त्यात 4 आणि 5 BHK लक्झरी अपार्टमेंट्स आहेत. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये २००० स्क्वेअर फुटांचं संग्रहालय उभारण्यात येणार असून यात दिलीप कुमार यांच्या वस्तू आणि त्यांच्या आठवणी ठेवल्या जाणार आहेत. 2016 मध्ये दिलीप कुमार यांनी आशर ग्रुपसोबत हा करार केला होता. सायरा बानो यांच्याशी विवाह केल्यावर दिलीप यांनी या बंगला सोडला होता.

दिलीप कुमार यांच्या पाली हिल येथील या बंगल्यावर या आधी बरेच कायदेशीर वाद सुद्धा झाले आहेत. दिलीप कुमार यांच्या कुटुंबाने रिअल इस्टेट फर्मवर खोटी कायदेशीर कागदपत्रे बनवल्याचा आरोप करण्यात आला होता. पण काही महिन्यांपूर्वी सायरा बानो यांनी आता वाद मिटल्याचं आणि केस बंद झाल्याचं जाहीर केलं होतं.

ट्रॅजेडी किंग अशी ओळख असलेल्या दिलीप कुमार यांचं नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं. त्यांनी केलेले अनेक बॉलिवूड सिनेमे गाजले. मधुबाला आणि त्यांची जोडी चर्चेत होती. ते दोघ लग्नही करणार होते पण काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files: 'एपस्टीन'चे नराधम! लहान मुलांचा बळी देऊन मांस खायचे? नव्या कागदपत्रांमध्ये नरभक्षणासंदर्भात स्पष्ट उल्लेख

U19 World Cup: 'सूर्याला तुम्ही थांबवू शकत नाही...' वैभव सूर्यवंशीच्या वादळी १७५ धावानंतर सेहवागची पोस्ट चर्चेत

Brahmapuri Crime : मुलीला आजीकडे झोपवल्याच्या रागातून मुलाकडून वडिलांचा लोखंडी सब्बलने वार करून निघृण खून; आरोपी ताब्यात

U19 World Cup: भारताची 'यंगिस्तान' सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! अंतिम सामन्यात इंग्लंडवर मिळवला 'वैभव'शाली विजय

Pune News : अधिक्षक अभियंता पदाची पदोन्नती रद्द करा; महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT