Premier

Viral Video : जिमी फॅलोनला दिलजीतने शिकवली पंजाबी ; व्हिडीओ झाला व्हायरल

Diljit Dosanj teaches punjabi to Jim Fallon : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने जिमी फॅलोनला पंजाबी शिकवली आणि जिमीच्या उत्तराने दिलजीत चकित झाला.

सकाळ डिजिटल टीम

बनणं Diljit Dosanj : पंजाबी गायक-अभिनेता म्हणून ओळख कमावल्यानंतर अभिनेता दिलजीत दोसांजने बॉलिवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच दिलजीतने हॉलीवूडचा सुप्रसिद्ध शो 'द टुनाईट शो विथ जिमी फॅलोन'ला हजेरी लावली आहे. या शोचे खास बिहाइंड द सीन क्षण दिलजीत आणि जिमीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. तर या शोच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिलजीत जिमीला पंजाबी शिकवताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दिलजीतचा आणि जिमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये दिलजीत जिमला पंजाबी शिकवताना दिसतोय. दिलजीत म्हणतो,"पंजाबी आ गए होये" जिम ते वाक्य रिपीट करतो तेव्हा त्याला होये शब्द बोलता येत नाही मग दिलजीत त्याला 'सत श्री अकाल' म्हणायला शिकवतो ते जिमला जमल्यावर दिलजीत खुश झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं.

दिलजीतने खास पंजाबी लूक मध्ये हजेरी लावली. पांढरा कुर्ता, पायजमा, काळं जॅकेट आणि पांढरा फेटा या लूकमध्ये दिलजीतने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर जिमने ग्रे रंगाचा सूट, त्यात आकाशी रंगाचा शर्ट आणि टाय असा पोशाख केला होता.

दिलजीतचा हा शो कधी प्रसारित होणार हे अजून समजलं नाहीये. सगळेजण त्याच्या या शोची आतुरतेने वाट पाहत आहे.

दिलजीतचे आगामी प्रोजेक्ट्स

दिलजीतचा नुकताच चमकीला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. त्याचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. परिणीती चोप्रा बरोबर त्याने या सिनेमात काम केलं होतं. अमर सिंह चमकीला या लोकप्रिय पंजाबी गायकाची भूमिका त्याने या सिनेमात साकारली होती. दिलजीत लवकरच जाट अँड ज्युलिएट ३ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बरोबरच नो एंट्री २ या सिनेमात तो वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांच्या बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT