Premier

Anurag Kashyap & Abhay Deol Controversy : "मी जर खरं बोललो तर अभय कोणाला तोंड दाखवू शकणार नाही" ; अखेर 'त्या' वादावर अनुरागने सोडलं मौन

Anurag Kashyap talks about Abhay Deol : दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभय देओलबरोबर असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं.

सकाळ डिजिटल टीम

'गँग्स ऑफ वासेपुर', 'देव डी' यांसारख्या भन्नाट सिनेमांचा दिग्दर्शक अनुराग कश्यप आता आणखी एक नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'बॅड कॉप' असं त्याच्या या सिनेमाचं नाव असून सध्या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये तो खूप बिझी आहे. नुकतंच त्याने जोनास सिक्वेरा चॅनेलला मुलाखत दिली आणि यावेळी त्यांनी अभय देऊन सोबत असलेल्या त्याच्या वादावर मौन सोडलं.

जोनासच्या मुलाखतीत अनुरागला अभय आणि त्याच्या मध्ये असलेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अनुराग असं म्हणाला की, " 'देव डी' या सिनेमाच्या शूटिंगनंतर मी आणि अभय एकमेकांना अजिबात भेटलेलो नाही. इतकच नाही तर अभय 'देव डी'च्या प्रोमोशनला सुद्धा हजर नव्हता. त्याने ते करणं टाळलं. त्या सिनेमानंतर तो कधीच माझ्याशी बोलला नाहीये. जर तो मला टॉक्सिक म्हणतोय तर ती त्याच्या बाजूची गोष्ट आहे. जर मी खरं सांगायचं ठरवलं तर अभय कोणालाच तोंड दाखवू शकत नाही. इतकं सत्य दडलेलं आहे की, अभय मध्ये त्याविषयी बोलायचं धाडस नाहीये आणि त्याविषयी मी कधीच बोलणार नाही. नाहीतर तो खूप वाईट आहे असं वाटू शकतं."

इतकंच नाही तर अनुरागने त्याला इंडस्ट्रीत कायम समस्याग्रस्त आणि घातक या नावाने ओळखलं जातं. यावरही भाष्य केलं त्यावर तो म्हणाला की," मी प्रत्येक वेळी प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. ज्या लोकांना माझ्यापासून समस्या आहेत त्यांच्यासोबत मी काम करणं टाळतो आणि ज्यांना माझ्याच समस्या आहेत असं वाटतं त्यांनी अजून माझ्याबरोबर कामच केलेलं नाहीये. त्यामुळे मी त्यांना प्रॉब्लेमॅटिक व्यक्ती वाटतो."

अनुराग आणि अभयने 'देव डी' या सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा गाजला असला तर अनेक समीक्षकांनी त्यावर टीका केली होती. तर खुद्द अभयने हा सिनेमा अहंकारी पुरुषी वृत्तीचे प्रदर्शन करणारा आहे असं म्हणत टीका केली होती. त्यामुळेच अनुराग आणि त्याच्यात वाद झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT