sameer vidwans  sakal
Premier

डोईवरती पडती अक्षता... दिग्दर्शक समीर विद्वांस अडकला लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, पाहा फोटो

Sameer Vidwans wedding photos: लोकप्रिय मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस याने गर्लफ्रेंड जुईली सोनाळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

Payal Naik

Sameer Vidwans Marriage: मनोरंजन विश्वातली कलाकारांचे लग्नसोहळे हे चर्चेचा विषय असतात. पुन्हा एका कलाकाराच्या लग्नाची चर्चा होऊ लागलीय. हा कलाकार आहे मराठी, हिंदीतला लोकप्रिय दिग्दर्शक समीर विद्वांस. समीरने आत्तापर्यंत अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आणलेत. मात्र यंदा त्याच्या लग्नाच्या बातमीने समीर चर्चेत आलाय. दिग्दर्शक समीर विद्वांसने नुकतीच लगीनगाठ बांधलीय. समीरच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत.

sameer vidwans wedding

दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमेने समीरच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. हेमंतने समीरच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण सोशल मिडीयावर समोर आणले आहेत. या विवाहसोहळ्याला मनोरंजन विश्वातली अनेक कलाकार मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. समीर विद्वांसने त्याच्यासोबतची सहाय्यक दिग्दर्शक जुईली सोनकरसोबत लगीनगाठ बांधली आहे.

sameer vidwans wedding

दिग्दर्शक,अभिनेता हेमंत ढोमेने त्याचा मित्र समीरच्या लग्नात हजेरी लावली होती. या लग्नाचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर करत त्याने समीर आणि जुईलीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक समीर विद्वांसच्या लग्नाआधीचे केळवण सोहळ्याचे फोटोही सोशल मिडीयावर समोर आले होते. काही कलाकारांनी समीर आणि जुईलीसाठी केळवण आयोजित केले होते.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात समीर विद्वांस आणि जुईली सोनकर यांनी साखरपुडाही केला होता. या साखरपुडा सोहळ्याला देखील समीरच्या अनेक कलाकार मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चर्चा आणि उत्सुकता अनेकांना होती. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समीरने सोशल मिडीयावर साखरपुड्याचा फोटोही शेयर केला होता. समीर आणु जुईलीने २०१७ मध्ये मला काही प्रॉब्लेम नाही या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं.

समीर हा मराठ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आहे. समीरने आत्तापर्यंत दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी ‘टाईम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘आनंदी गोपाळ’, ‘धुरळा’ हे लोकप्रिय चित्रपट आहेत. तर बॉलीवुडसाठी देखील समीरने दिग्दर्शन केलय. ‘सत्यप्रेम की कथा’ या हिंदी चित्रपटाचं समीरने दिग्दर्शन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT