disha patani  sakal
Premier

Disha Patan- Prabhas: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करतेय दिशा पटानी? अभिनेत्रीच्या टॅटूमुळे रंगली एकच चर्चा

Disha Patani Dating Rumors With Prabhas: अभिनेत्री दिशा पटानी अभिनेता प्रभासला डेट करतेय असं म्हटलं जातंय.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे. तिने २०१५ साली तामिळ चित्रपट 'लोफर' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मध्ये दिसली. व्यावसायिक आयुष्यासोबतच दिशा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चा होत्या. ते दोघे रिलेशनमध्ये होते. मात्र आता दिशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दिशा दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करत असल्याचं बोललं जातंय. त्याचं कारण आहे तिच्या हातावरील टॅटू.

अभिनेत्रीच्या हातावरील टॅटू चर्चेत

दिशाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तिने फिकट निळ्या रंगाचा टॉप आणि जॉगर्स घातले आहेत. डोळ्याला गॉगल आणि हातात पांढरी पर्स आहे. या फोटोमध्ये दिशाच्या डाव्या हातावर एक टॅटू स्पष्ट दिसत आहे. या टॅटूमध्ये दोन अक्षरं आहेत. पी आणि डी. पीडी ही अक्षरं पाहून नेटकरी आता तिच्या आणि प्रभासच्या डेटिंगचा अंदाज लावत आहेत. हा टॅटू प्रभास आणि दिशा यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांचा असल्याचा चर्चा आहेत. ते दोघेही नुकतेच 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचं नातं जुळलं असल्याचं बोललं जातंय.

disha patani

तर दुसरीकडे काही नेटकरी हा टॅटू तिच्याच नावाचा असल्याचं सांगत आहेत. पीडी म्हणजेच पटानी दिशा असल्याचं तिचे चाहते सांगत आहेत. यापूर्वी दिशा ही टायगर श्रॉफ याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. आता दिशा आणि प्रभास खरंच एकमेकांना डेट करत आहेत का हे येत्या दिवसात कळेलच मात्र यामुळे दिशाचे चाहते आनंदात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT