divya agarwal  sakal
Premier

Divya Agarwal: आधी काम काढून घेतलं, आता नंबर ब्लॉक; दिव्या अग्रवालवर ब्रोकरचे फसवणुकीचे आरोप, पैसे न दिल्याने वैतागला एजंट

Divya Agarwal Accused For Not Paying Brokerage: बिग बॉस OTT 1 ची विजेती दिव्या अग्रवाल आणि तिचा पती अपूर्व पाडगावकर यांच्यावर एजंटने फसवणुकीचे आरोप केले आहेत.

Payal Naik

'बिग बॉस ओटीटी १' ची विजेती ठरलेली लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवाल अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. ती तिच्या लग्नामुळे आणि तिच्या प्रेगन्सी न्यूजमुळे चर्चेत होती. आता ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिव्या आणि तिच्या पतीवर एका एजंटने पैशांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आपण तिला घर खरेदी करायला आणि विकायला मदत केली मात्र तिने आपले पैसे दिलेच नाही उलट आता नंबर ब्लॉक केला आहे असं त्या एजंटने सांगितलं आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

या एजंटचं नाव रफीक मर्चंट असून त्याने दिव्या आणि तिचा बिझनेसमन पती अपूर्व पाडगावकर यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत. रफीक या व्हिडिओमध्ये म्हणतो, 'तुम्ही मीटिंगला हजेरी लावली होती आणि नोंदणीमध्येही भाग घेतला होता, पण नंतर तुम्ही माझ्या कॉलला उत्तर देणं बंद केलं आणि मला मेसेज आणि DM वर ब्लॉक केलं. असं का वागताय? अपूर्व पाडगावकर, तुम्ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि यशस्वी उद्योजक देखील आहात. तुम्ही हे का करताय? तो माझा हक्क आहे तो तुम्ही का काढून घेताय? तुम्ही लोक पुढे जाऊन तुम्हाला हवे ते करू शकता, पण आमची रोजीरोटी हिरावून घेऊ नका. कृपया मला माझ्या ब्रोकरेजचा एक टक्का द्या.'

रफीकने सांगितलं की दिव्या आणि अपूर्व यांचा फ्लॅट विकण्यात त्याला काहीच फायदा झालेला नाही. त्याने त्यांचा फ्लॅट खरेदी करायला आणि विकायला दोन्ही वेळेस मदत केली होती. मात्र आता ते त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. यावर दिव्या आणि तिच्या पतीने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. ते दोघे २० फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जुबेर हंगरगेकरच्या संपर्कातील १२ जणांची चौकशी'; माेबाईल, सीडीआरची पडताळणी होणार, दिल्ली बॉम्बस्फोटाशी कनेक्शन?

Maharashtra Politics: शिंदे गटाला झटका! बड्या नेत्यांची भाजपात एन्ट्री, निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेनेला टेन्शन

हेमामालिनीशी लग्न केल्यानंतर धर्मेंद्र पडलेले 27 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात, बायकोने दिलेली धमकी..

Dhule Crime : धक्कादायक! पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत महिलेकडून ६० लाख उकळले

Pimpri News : काळेवाडीत बेवारस वाहनांचा प्रश्न ऐरणीवर; महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT