divyanka and vivek sakal
Premier

Divyanka Tripathi: भुरट्या चोराच्या हातसफाईने युरोप दौऱ्यात दिव्यांका-विवेक झाले कंगाल!

Divyanka Tripathi and Vivek Dahiya are stuck in Europe: दिव्यांका-विवेक हे त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही स्टार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. हे दोघेही सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून तिथे एन्जॉय करत आहेत. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत, मात्र या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांची निराशा झाली.

आता हे जोडपं युरोपमध्ये अडकले आहे. हे दाम्पत्य त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला गेले होते. ते १० जुलै रोजी फ्लॉरेन्सला पोहोचले होते. तिथे चोरीची घटना घडली. त्यांच्या पर्समधून भुरट्या चोराने त्यांचा पासपोर्ट आणि १० लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरल्या.

माध्यमांशी बोलताना विवेक म्हणाला, ‘‘ही घटना सोडली तर या प्रवासात सर्व काही व्यवस्थित पार पडले. आम्ही फ्लॉरेन्समध्ये होतो आणि एक दिवस इथेच रहायचं ठरवलं. आम्ही एक प्रॉपर्टी तपासली आणि मग आमचे सामान बाहेर कारमध्ये ठेवले, मात्र आम्ही सामान घेण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. कोणीतरी कारची खिडकी तोडून आमचे पासपोर्ट, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि पाकीट चोरले होते. त्यांनी मागे फक्त काही जुने कपडे आणि खाद्यपदार्थ सोडले.’’

याबाबत विवेकने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सीसीटीव्हीशिवाय मदत करू शकत नाही, असे सांगून मदत करण्यास नकार दिला. ‘‘तुम्ही तिथे गेलात का,’’ असे पोलिसांनी विचारले. विवेक आणि दिव्यांका सध्या तात्पुरता पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, जो त्यांना फक्त एम्बसीतून मिळू शकेल. विवेकने सांगितले की, आता त्यांच्याकडची रोख रक्कमही संपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT