Do Aur Do Pyaar esakal
Premier

Do Aur Do Pyaar: प्रतीक-विद्या दिसणार 'दो और दो प्यार' सिनेमात, 'या' दिवशी रिलीज होतोय ट्रेलर

Do Aur Do Pyaar: 'दो और दो प्यार' या सिनेमामध्ये एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

priyanka kulkarni

Do Aur Do Pyaar: वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे सध्या सिनेइंडस्ट्रीत प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूडची लेडी सुपरस्टार विद्या बालनचा आता नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'दो और दो प्यार' असं या सिनेमाचं नाव असून एक हटके लव्हस्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. नेटकऱ्यांना टीझर पसंत पडला.

दोन जोडप्यांची प्रेम कथा या सिनेमात पाहायला मिळणार असण्याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. नोरा, अनि, काव्या आणि विक्रम या चौघांचं आयुष्य, त्यांची लव्हलाईफ, रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन या सिनेमात पाहायला मिळेल असा अंदाज टीझर पाहिल्यावर येतोय.

ही आहे सिनेमाची कास्ट:

या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वेगळं कास्टिंग या सिनेमात पाहायला मिळेल. विद्या बालन काव्याची भूमिका साकारतेय तर नोराच्या भूमिकेत इलियाना डिक्रूझ आहे. प्रतीक गांधी तर सेंधील राममूर्ती विक्रम या भूमिकेत असेल. पहिल्यांदाच हे सगळे कलाकार एकत्र काम करत आहेत.

या सिनेमाचं पहिलं गाणं 'जसबाती है दिल' हे गाणं रिलीज झालं असून सोशल मीडियावर हे गाणं सगळ्यांनाच पसंत पडलं आहे. आणि उद्या म्हणजे ६ एप्रिल २०२४ ला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सिनेमाच्या ट्रेलरसाठी उत्सुक असल्याचं म्हंटल. १९ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

विद्याचा काही महिन्यांपूर्वी 'नियत' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस आला तर सध्या ती भुलभुलैय्या ३ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी यांच्यासोबत काम करतेय. तर 'स्कॅम' फेम प्रतीक गांधीचा नुकताच 'मडगाव एक्स्प्रेस' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT