Uorfi Javed Esakal
Premier

Uorfi Javed : खरंच टक्कल केलं? उर्फीच्या फोटो मागील सत्य नेटकऱ्यांनी केलं उघड

Uorfi Javed Publicity Stunt : सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदने तिचा टक्कल केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला पण नेटकऱ्यांनी चतुराईने तिचा हा स्टंट उघड केलाय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या अतरंगी अंदाजामुळे सगळीकडे चर्चेत असते. तिची हटके फॅशन आणि बिनधास्त वागण्यामुळे ती कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. उर्फी पुन्हा एकदा अशाच तिच्या अतरंगी स्टाईल मुळे चर्चेत आलीये. सोशल मीडियावरील तिची पोस्ट व्हायरल झालीये.

उर्फीने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला. हा फोटो बघून सगळ्यांनाच धक्का बसला. उर्फीने चक्क टक्कल केल्याचं या फोटोत दिसतंय. आता तिने खरंच टक्कल केलंय की फिल्टर वापरलाय कि विग घातलाय हे समजत नव्हतं. तिचा असा फोटो शेअर करण्यामागचं कारणही अजून तिने उघड केलं नाहीये.

तिचा हा फोटो व्हायरल झाला असून गुलाबी टॉप, गळ्यात चेन आणि केसांचं टक्कल या लुकमुळे अनेकांनी तिच्यावर टीका केलीये. तिने खरंच टक्कल केलंय कि हा तिचा पब्लिसिटी स्टंट आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. काहींनी कमेंट करत उर्फीला तसा प्रश्नही कमेंट्समध्ये विचारलाय.

पण जर हा फोटो नीट पहिला तर उर्फीने फिल्टर वापरल्याचं आणि तिचे केस दिसत असल्याचं दिसून येतंय. अनेकांनी ही गोष्ट कमेंट्समध्ये रिव्हील केली आहे.

याआधीही ती हे असेच अनेक लूक व्हायरल झाले होते. काळ्या रंगाचा तिने डिझाईन केलेला बटरफ्लाय गाऊन अनेकांना आवडला होता. अनेकांनी कमेंट्स करत तिच्या या गाऊनचं कौतुक केलं होतं आणि यापुढे तिने असेच कपडे घालावेत असा सल्लाही तिला दिला होता.

उर्फीच्या कामाबाबत सांगायचं झालं तर उर्फी स्प्लिट्सविला शोची होस्ट आहे. यासोबतच ती लव्ह सेक्स और धोका 2 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमातील तिची भूमिका छोटी असली तरीही तिने एक अनकट बोल्ड सीन चित्रित केल्याची चर्चा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी करत आहेत. या शिवाय ती आणखी काही प्रोजेक्टस्मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

उर्फीची या सिनेमातील भूमिका तिच्या निर्मात्यांना आवडली असून ती खूप उत्तम अभिनेत्री आहे आणि भविष्यात तिला चांगल्या भूमिका मिळू शकतात असं वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीमध्ये केलं आहे.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT