dhrashti dhami baby  esakal
Premier

३९ व्या वर्षी आई झाली टीव्हीची 'मधुबाला'; १० व्या महिन्यात दिला गोंडस बाळाला जन्म, चाहते करतायत तब्येतीची विचारणा

Tv Actress Drashti Dhami Blessed With Baby Girl: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी आई बनली आहे. तिने १० व्या महिन्यात बाळाला जन्म दिला आहे.

Payal Naik

'मधुबाला' म्हणून छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली अभिनेत्री दृष्टी धामी हिने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना गुड न्यूज देत आपण आई होणार असल्याचं सांगितलं होतं. युनिक पद्धतीने त्यांनी आपण आई बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता अखेर दृष्टीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दृष्टीला मुलगी झाली आहे. तिने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केलीये. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दृष्टीने दहाव्या महिन्यात आपल्या मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे चाहते आता तिच्या आणि बाळाच्या तब्येतीची चौकशी करत आहेत.

दृष्टीने इंस्टाग्रामवर ही गोड बातमी शेअर केली. तिने एक पोस्ट करत लिहिलं, 'ती आलीये. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी ती आलीये. सरळ स्वर्गातून आमच्या मनात. एक नवी सुरुवात. एक नवीन जीवन. दृष्टीच्या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. तिची मैत्रिण सनाया इराणीने लिहिलं, 'माझी मुलगी आली आहे.' शक्ती अरोरा हिनेदेखील अभिनंदन केलं. जेनिफर विंगेट, रुबिना दिलैक, नकुल मेहता, करण ग्रोव्हर, दिशा परमार, आदिती गुप्ता, पूजा गौर, सुमोना चक्रवर्ती, मौनी रॉय, सुरभी ज्योती, किश्वर मर्चंट यांच्यासह अनेक कलाकारांनीही या जोडप्याचं अभिनंदन केले आहे.

यापूर्वी, दृष्टी धामीने एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती की 41 आठवडे झाले आहेत आणि बाळ अद्याप आलेलं नाही. आता तर तिची चिडचिडही झाली आहे. याच पोस्टवर राहुल वैद्यची पत्नी दिशा हिने कमेंट करत लिहिलेलं की, त्यांच्या बाळाला इतकी घाई होती की ते 37 व्या आठवड्यातच बाहेर आलं.

लग्नानंतर 9 वर्षांनी आई झाली

10 जानेवारी 1985 रोजी मुंबईत जन्मलेली दृष्टी ही नृत्य प्रशिक्षक होती. त्यानंतर मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली. तिने 'दिल मिल गए', 'गीत', 'मधुबाला', 'एक था राजा एक थी रानी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने 'झलक दिखला जा 6' हा डान्स शो जिंकला आहे. 'द एम्पायर' या वेबसिरीजमध्ये दिसली आहे. तिने 21 फेब्रुवारी 2015 रोजी बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केलं. लग्नाच्या 9 वर्षानंतर ती आई झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT