Jacquline Fernandez  Esakal
Premier

Jacqueline Fernandez : दिलासा नाहीच ! जॅकलिनला पुन्हा ईडीने बजावले समन्स !

Jacqueline Fernandez money laundering case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीने पुन्हा मनी लॉन्ड्रींग प्रकरणात समन्स बजावले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez Case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सुकेश चंद्रशेखरशी तिचे संबंध असल्याचं उघड झाल्यावर तिच्या मागे चौकशीचा फेरा लागला आहे. पुन्हा एकदा जॅकलिनला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात समन्स बजावले आहे. द हिंदूंच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार जॅकलिनला सक्तवसुली संचालनालयाने सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आज १० जुलैला चौकशीसाठी बोलावले आहे.

सुकेशवरील आरोप

फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांची तब्बल २०० करोड रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच अशा अनेक उच्चभ्रू लोकांच्या फसवणुकीच्या प्रकरणात या ३८ वर्षीय अभिनेत्रींचे फेडरल एजन्सीने या आधी चौकशी केली होती.

ईडीने केलेल्या आरोपानुसार, सुकेशने या लोकांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशांचा वापर जॅकलिनला महागडे गिफ्ट खरेदी करण्यासाठी केला होता. २०२२ मध्ये फाईल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित असून जॅकलिन त्याच्याकडून मिळत असलेले महागडे गिफ्ट्स स्वीकारत होती आणि वापरत होती.

"मी निर्दोष आहे" - जॅकलिन

या आधीही ईडीने जॅकलिनची पाच वेळा या प्रकरणात चौकशी केली असून जॅकलिनने ती या प्रकरणात निर्दोष असल्याचं सांगितलं होतं आणि सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी तिला माहित नव्हती असंही ती यावेळी म्हणाली होती. चंद्रशेखरने तिच्या भावनांशी खेळून तिचे “जीवन नरक” बनवल्याचा आरोपही तिने केला होता. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्रीला सुकेशकडून पर्शियन मांजर आणि अरबी घोडा यांसारख्या महागड्या भेटवस्तू मिळाल्या असल्याचं म्हंटलं आहे.

परदेशी जाण्यास बंदी

विशेष म्हणजे, हे आरोपपत्र दाखल झाल्यापासून जॅकलिनला देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यासाठी लूक आऊट जारी करण्यात आला असून २०२१ मध्ये तिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं.

पिंकी इराणी या व्यक्तीमार्फत जॅकलिनची सुकेशची भेट झाली होती असं म्हणण्यात येतंय. पिंकी ही सुकेशची सहकारी असून त्याने केलेल्या गुन्ह्यांमध्ये तिचाही सहभाग होता असं पोलिसांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT