Kriti Sanon Esakal
Premier

Crew Sequel: क्रू सिनेमाचा सिक्वेल येणार? कृतीने केला खुलासा, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा धुमाकूळ

याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने अभिनेत्री कृती सॅनॉनची मुलाखत घेतली. त्यावेळी तिला या सिनेमाचा सिक्वेल येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Kriti Sanon on Crew Movie Sequel: कृती सॅनॉन, करिना कपूर आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला क्रू हा सिनेमा सध्या सगळीकडे गाजतोय. २९ मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर सुद्धा या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा बॉलिवूडमधील सगळ्यात यशस्वी ओपनिंग केलेला स्त्री प्रधान सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने फक्त पाच दिवसांत ७० करोड रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सिनेमाची टीम खूप खुश आहे.

याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने अभिनेत्री कृती सॅनॉनची मुलाखत घेतली. त्यावेळी तिला या सिनेमाचा सिक्वेल येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कृतीने "आम्ही खरंच वाट बघतोय कि पुन्हा एकत्र येऊन आणि काहीतरी मजेशीर बनवण्याचा प्रयत्न करू. अर्थातच यामुळे लेखकांवर खूप दडपण येईल. कायम प्रेक्षकच फिल्ममेकर्सना सिक्वेल बनवण्याची प्रेरणा देत असतात. जर त्यांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही नक्कीच नंतर काहीतरी आणखी स्पेशल करण्याचा प्रयत्न करता. आशा आहे कि आम्ही सिक्वेल करू." असं उत्तर दिलं.

याबाबत आणखी बोलताना ती म्हणाली,"या कलाकृतीला मिळालेला प्रतिसाद बघून खरंच खूप छान वाटतंय. हा पुरुष प्रधान सिनेमा आहे कि स्त्री प्रधान सिनेमा आहे हे खरंच महत्त्वाचं नाहीये. हे फक्त कलाकृतीला मिळालेलं प्रेम आहे आणि हा सिनेमा बनवण्यामागे हाच उद्देश होता कि बॉक्स ऑफिसचे आकडे सिनेमा पुरुष प्रधान आहे कि स्त्री प्रधान आहे यावर ठरत नाहीत तर कथानकावर ठरतात. "

कृतीने दिलेल्या या उत्तरावरून लवकरच या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा होईल अशी आशा करायला चाहत्यांनी हरकत नाही. एकता कपूर आणि रिहा कपूर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकत नवा इतिहास रचला आहे.

काय आहे सिनेमाचं कथानक:

एअरहोस्टेस म्हणून काम करणाऱ्या तीन मैत्रिणी ज्या एअरलाईनमध्ये काम करत असतात ती कंपनी अचानक बंद पडते. कंपनी दिवाळ्यात गेल्याच जाहीर करून कंपनीचा मालक पळून जातो त्यानंतर या तीन मैत्रिणी काय मार्ग पत्करतात याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT