celebrity divorce in 2024 sakal
Premier

Celebrity Couple Divorce: कुठे फसवणूक तर कुठे मतभेद, नताशा- हार्दिकच नाही, यावर्षी 'या' लोकप्रिय जोड्यांचेही मोडले संसार

Celebrity Divorce In 2024: क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्या सोबतच यावर्षी आणखी चार जोड्यांची वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Payal Naik

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हार्दिकने पोस्ट करत नताशा हीच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. ४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपण मिळून आपल्या मुलाचा सांभाळ करू असं त्यांनी सांगितलं. मात्र यानंतर सोशल मीडियावर अशा सेलिब्रिटी जोड्यांच्या नावाची देखील चर्चा होऊ लागली ज्यांनी या वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पाहूया कोण आहेत ते.

isha deol divorce

ईशा देओल आणि भरत तख्तानी

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी यावर्षीच डिव्होर्स घेतला. याच वर्षी त्यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. भरत तख्तानी हा दुसऱ्या मुलीसाठी ईशाची फसवणूक करत होता. त्यामुळे अखेर ईशाने या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१२ साली लग्नगाठ बांधली होती. आता २०२४ साली १२ वर्षांनी ते वेगळे झाले.

diljeet kaur divorce

दलजीत कौर आणि निखिल पटेल

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने मागील वर्षी परदेशी बिझनेसमन निखिल पटेलशी विवाह केला होता. मात्र काही महिन्यातच ती परत भारतात अली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर आपण वेगळे होत असल्याची घोषणा केली. निखिल एका व्यक्तीला डेट करत असल्याचं दलजीतने सांगितलं. अखेर आरोप प्रत्यारोपानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

isha koppikar divorce

ईशा कोप्पीकर आणि टीम्मी नारंग

अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि बिझनेसमन टीम्मी नारंग यांनी २०२४च्या सुरुवातीलाच आपण वेगळे होत असल्याची घोषणा केली. त्यांनी २००९ साली लग्नगाठ बांधली होती. मात्र आता जवळपास १५ वर्षांनी ते वेगळे झाले. ते एकत्र मिळून आपल्या मुलीचा सांभाळ करणार आहेत. त्यांचं नातं एकमेकांतील मतभेद असल्याचं त्यांनी सांगितलं.

malaika arora

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेले अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांनी लग्न केलं नसलं तरी ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करायचे. अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावायचे. असं असताना अचानक त्यांनी एकमेकांपासून दूर राहणं सुरू केलं. त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT