Salman Khan sakal
Premier

Salman Khan : जेव्हा फॅन्सनी सलमानला घराबाहेर बदडलं होतं, सख्ख्या भावानेच दिली होती कबुली

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या हल्ल्यामुळे सलमानचे चाहते आणि कुटूंबीय खूप चिंतेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या हल्ल्यामुळे सलमानचे चाहते आणि कुटूंबीय खूप चिंतेत आहेत. या आधीही सलमानला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. यातच आता सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काही वर्षांपूर्वी सलमानने त्याचे दोन्ही भाऊ अरबाजआणि सोहेल यांनी द कपिल शर्मा शोला हजेरी लावली होती. यावेळी सलमान आणि सोहेलने त्यांच्या फॅन्ससोबत झालेल्या मारामारीचा किस्सा शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कपिलने सोहेलला तुमच्यावर कधी भांडणाचा प्रसंग आलाय आणि त्यावेळी तुम्ही लोकांना घाबरवण्यासाठी कधी तुमच्या भावाला (सलमानला) घेऊन गेला आहात का? प्रश्न विचारला. त्यावर सोहेलने त्यांच्याबाबतीत घडलेली घटना सांगितली. सोहेल बॅण्डस्टॅण्डवरून येत असताना त्याला त्याच्या अपार्टमेंटखाली एक चाहता उभा होता आणि तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जोरजोरात शिव्या घालत होता.

सोहेलला वाटलं कि, तो एकटाच उभा आहे तर मी त्याच्याशी भांडू शकतो. म्हणून तो त्याच्याजवळ गेला आणि त्याला त्याने असं करू नये म्हणून ओरडला. या बिल्डिंगमध्ये अजून लोक राहतात तर तू शिव्या घालू नकोस असं म्हंटलं. तेव्हा तिथून गाडी घेऊन अजून काही लोक आली जी त्याच्याबरोबर होती आणि त्यांनी सोहेलला मारायला सुरुवात केली.

त्याला मारताना पाहून त्यांच्या सोसायटीचा वॉचमन त्याला वाचवण्याऐवजी आत पळाला आणि त्याने सलमानला बोलवून आणलं. त्यानंतर सलमानने त्यांना खूप बदडलं. हे सुरु असतानाच सलमानच्या पाठीवर एकाने बांबू मारला आणि त्याने सलमानला जोरदार मार बसला. त्यानंतर पोलीस आले आणि पोलीस त्या लोकांना घेऊन गेले. मग सलमानला त्यांची दया आली आणि त्यानेच त्यांना सोडवून आणलं.

सलमान आणि सोहेलने शेअर केलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. दरम्यान, सलमान आता घडलेल्या घटनेबाबत काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. त्याच्या आणि त्याच्या कुटूंबियांच्या सुरक्षितेत आता वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Municipal Council Election: गड राखला; पण नगराध्यक्ष गमावला! भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखण्यात यश

सचिन पिळगांवकरांना सुद्धा लागलं FA9LA गाण्याचं वेड, सुप्रियासोबत केला भन्नाट डान्स, viral video

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला- चंद्रशेखर बावनकुळे

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

SCROLL FOR NEXT