Farhan Akhtar On Dil Chahta Hai Sequel. Esakal
Premier

Dil Chahta Hai Sequel: 'दिल चाहता है'चा सिक्वेल येणार का? फरहान अख्तरने एका वाक्यात संपवला विषय

Farhan Akhtar: दरम्यान गेल्या अडीच दशकांपासून या चित्रपटाने रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. आजय या चित्रपटाची लोकप्रियता शिखरावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Farhan Akhtar On Dil Chahta Hai Sequel:

बॉलिवूडमध्ये असे मोजकेच कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय, लिखाण आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत आपली छाप सोडली आहे. त्यापैंकीच एक नाव म्हणजे फरहान अख्तर.

आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'डॉन 3' चित्रपटामुळे फरहान अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चाहत्यांनी डोक्यावर घेतलेल्या डॉन मालिकेत नव्या चित्रपटासह फरहान पुन्हा एकदा दिग्दर्शनामध्ये आपले नशीब आजमावणार आहे.

फरहान डॉन पुन्हा घेऊन येत असला तरी चाहत्यांना मात्र, 2001 मध्ये फरहानने दिग्दर्शित केलेल्या 'दिल चाहता है'ची आस लागली आहे. चाहते सातत्याने फरहानला 'दिल चाहता है'चा सिक्वेल केव्हा येणार याबाबत सतत प्रश्न करत आसतात.

मात्र, आता फरहानने याबाबतचे आपले मौन सोडत या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल माहिती देत 'दिल चाहता है'चा सिक्वेल येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना फरहान म्हणाला, जेव्हा जेव्हा मला विचरालते की 'दिल चाहता है'चा सिक्वेल केव्हा येणार. तेव्हा तेव्हा मी चकित होतो. मला प्रश्न पडतो की, लोकांना हा चित्रपट इतका का आवडतो. पण'दिल चाहता है'चा सिक्वेल बनवण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही.

मला जे काही सांगायचे होते ते मी चित्रपटातून सांगितले आहे. आता पुन्हा त्या चित्रपटाचा सीक्वल आणणे म्हणजे पटकथेत काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करावा लागेल. जो मला कोणत्याही परिस्थितीत आवश्यक वाटत नाही.
फरहान अख्तर, दिग्दर्शक, 'दिल चाहता है'

फरहान अख्तरने पुढे सांगितले की, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', काही प्रमाणात 'रॉक ऑन' आणि 'जी ले जरा' यांसारखे चित्रपटा 'दिल चाहता है' सारख्याच भावना असलेले चित्रपट आहेत. याच कारणामुळे मी 'दिल चाहता'चा सिक्वेल बनवण्याचा विचार कधीच केला नाही.

दरम्यान, फरहान 'डॉन 3' या चित्रपटामधून दिग्दर्शक क्षेत्रात पुन्हा उतरणार आहे. या चित्रपटाक रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर कियारा अडवाणी या चित्रपटाची नायिका असणार आहे.

"दिल चाहता है"बद्दल

फरहान अख्तरने 10 डिसेंबर 2011 रोजी ब्लॉकबस्टर "दिल चाहता है"मधून दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते.

या चित्रपटामध्ये तीन मित्रांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. ज्यातून त्यांचे वैय्यक्तीक नातेसंबंध, करिअरबाबतच्या महत्त्वकांक्षा आणि मैत्रीचे विविध पैलू मांडण्यात आले आहेत.

यामध्ये आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना याच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान गेल्या अडीच दशकांपासून या चित्रपटाने रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. आजय या चित्रपटाची लोकप्रियता शिखरावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT