sushama shiromani movies  esakal
Premier

'भिंगरी' ते 'फटाकडी'; अल्ट्रा झकास OTT वर पाहता येणार अभिनेत्री सुषमा शिरोमणींचे हे लोकप्रिय चित्रपट

Sushma Shiromani Movies: मराठी रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी आतापर्यंत सात मराठी चित्रपटांचे निर्मिती व दिग्दर्शन केले आहे.

Payal Naik

ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी प्रख्यात निर्मात्या, दिग्दर्शक व महाराष्ट्र शासनातर्फे व्ही. शांताराम जीवनगौरवच्या पुरस्कारकर्त्या यांच्या लोकप्रिय चित्रपटांचं कलेक्शन आता अल्ट्रा झकास OTT वर मराठी उपलब्ध आहे. मराठी रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी आतापर्यंत सात मराठी चित्रपटांचे निर्मिती व दिग्दर्शन केले आहे, त्यापैकी हे पाच सुपरहिट मराठी चित्रपट 'भिंगरी', 'फटाकडी', 'मोसंबी नारंगी', 'भन्नाट भानु' आणि 'गुलछडी' आता प्रेक्षकांना अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येतील.

Sushma Shiromani Movies

या वेळी सुषमा शिरोमणी म्हणाल्या, "अल्ट्रा झकासने माझ्या चित्रपटांची निवड केल्याबद्दल मला खूप अभिमान आहे. हे चित्रपट माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे दर्शवतात. तसेच या चित्रपटांनी मला एक कुशल लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि वितरक बनण्यास मदत केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच मी बॉलीवूड चित्रपटांतील दिग्गज कलाकार रेखा जी, जितेंद्र जी, मौसमी चॅटर्जी जी, अरुणा इराणी जी आणि रती अग्निहोत्री यांसारख्या दिग्गज बॉलीवूड कलाकारांसोबत मराठी आयटम सॉंग्स सादर केले आहेत. बॉलीवूड कलाकारांच्या या सहकार्याने मराठी चित्रपटांची प्रतिष्ठा उंचावली आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या माध्यमातून हे 'गोल्डन जुबली' चित्रपट जगभरात पाहता येणार याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की हे चित्रपट नव्या पिढीला तितकेच आवडतील..”

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, "अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर ‘Golden Era’ जपणारे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत, यामुळे मराठी सिनेसृष्टीचा वारसा जपला जाईल. सोबतच अल्ट्रा झकास ओटीटीवर चित्रपटांव्यतिरिक्त ३०००+ तासांचे अनलिमिटेड मनोरंजन पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT