Virat Kohli and Anushka Sharma SAKAL
Premier

Father's Day 2024: फादर्स-डेनिमित्त विराटला वामिका आणि अकायकडून मिळालं खास गिफ्ट; अनुष्का फोटो शेअर करत म्हणाली...

Virat Kohli: वामिका आणि अकाय यांनी फादर्स-डेनिमित्त विराटला खास गिफ्ट दिलं आहे.

priyanka kulkarni

Virat Kohli and Anushka Sharma: आज फादर्स-डेनिमित्त विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आहेत. अशातच अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) देखील खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं वामिका (Vamika) आणि अकाय (Akaay) यांनी विराट कोहलीला (Virat Kohli) फादर्स-डेनिमित्त दिलेल्या गिफ्टचा फोटो दिसत आहे.

वामिका आणि अकाय यांच्याकडून विराटला खास गिफ्ट

वामिका आणि अकाय यांनी फादर्स-डेनिमित्त विराटला खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा फोटो अनुष्कानं शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक कार्ड दिसत आहे. या कार्डवर वामिका आणि अकाय यांचे फूट प्रिंट दिसत आहे. या कार्डवर "हॅप्पी फादर्स-डे", असं लिहिलेलं दिसत आहे. अनुष्कानं या कार्डचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "एक माणूस इतक्या गोष्टींमध्ये चांगला कसा असू शकतो? विराट, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो"

अनुष्का आणि विराटने 2017 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2021 ला अनुष्का आणि विराटची मुलगी वामिकाचा जन्म झाला. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 रोजी अनुष्कानं मुलाला जन्म दिला. विराट आणि अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन त्यांच्या मुलाच्या नावाची माहिती चाहत्यांना दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, "खूप आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला हे सांगायला आनंद झाला आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही वामिकाचा भाऊ अकायचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुम्ही आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्याल,अशी अपेक्षा आम्ही करते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: भले शाब्बास! छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिर्से फायनलमध्ये; पदकासाठीचा सामना केव्हा होणार घ्या जाणून

भरती प्रक्रियेतून निवड झाली, पण ३ महिन्यांपासून नियुक्तीची प्रतीक्षा; पात्र उमेदवारांचा जीव टांगणीला

Latest Marathi News Live Update: मालवीय नगर आगीच्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेला आचारी केसर नेगी याला जामीन मंजूर

गावातील राजकारण आणि 'अवली'चा नवा संघर्ष; 'सौभाग्यवती सरपंच २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ट्रेलर!

आधी अलिबाग, आता वर्सोवा! विराट-अनुष्काने मुंबईत घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT