Firing Outside Salman Khans Esakal
Premier

Firing Outside Salman Khans: बिश्नोई गँगची सलमान खानवर करडी नजर? गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत दिली धमकी

Firing Outside Salman Khans: सलमान खानच्या घराबाहेरील सकाळी गोळीबाराची घटना घडली होती. याची जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. दरम्यान या गोळीबाराची जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली आहे. एका फेसबुक अकाऊंटवरील पोस्टद्वारे या गोळीबाराची सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे.

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथिल घराबाहेर आज पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथिल घराबाहेर आज पहाटे गोळीबाराचा आवाज आला, असे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे 5 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत अनेक राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

मुंबई (Mumbai) पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. अशातच आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत.सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत, आता मुंबई पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत.

मुख्यमंत्र्यांचा सलमानला फोन

गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन करुन धीर दिला.तुमच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमानला सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली आहे. तसेच सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT