Premier

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Forbes List: फोर्ब्सने जाहीर केलेल्या '30 अंडर 30 एशिया' यादीत तंत्रज्ञान, लॉजिस्टिक आणि फॅशन बिझनेस अशा विविध क्षेत्रांतील नावे देखील आहेत.

priyanka kulkarni

Forbes 30 Under 30 Asia List Out: फोर्ब्सने गुरुवारी (16 मे) त्यांची '30 अंडर 30 एशिया' (Forbes 30 Under 30 Asia) ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील 30 वर्षांखालील तरुण उद्योजक, नेते आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींची नावं आहेत, जे नव्या गोष्टींना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या क्षेत्रात बदल घडवून आणत आहेत. या यादीमध्ये तंत्रज्ञान, लॉजिस्टिक आणि फॅशन बिझनेस अशा विविध क्षेत्रांतील नावे देखील आहेत. जाणून घेऊयात फोर्ब्सच्या या यादीबद्दल...

मनोरंजन क्षेत्रातील 'या' सेलिब्रिटींची नाव फोर्ब्सच्या यादीत

फोर्ब्सच्या '30 अंडर 30 एशिया' या यादीच्या 9 वी आवृत्तीत मनोरंजन क्षेत्रातील दोन व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी एक नाव पवित्र चारीचं आहे तर दुसरं नाव अर्पण कुमार चंदेलचे आहे. पवित्र चारी ही प्रशिक्षित गायक आणि संगीतकार आहे. तिला 2023 मध्ये ग्रॅमीसाठी नामांकन मिळाले होते. तर अर्पण कुमार चंदेल हा एक भारतीय रॅपर आणि गायक आहे. अर्पण हा किंग या नावानं ओळखला जातो. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. MTV Hustle या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या 'मन मेरी जान' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

'30 अंडर 30 एशिया' या यादीत विविध क्षेत्रातील व्यक्तींची नावं आहेत. कुश जैन,अर्थ चौधरी, देयवंत भारद्वाज, ओशी कुमारी,प्रणव मानपुरिया,अरुण श्रेयस, गौतम महेश्वरन,हर्षित जैन, अभिक साहा,कुणाल अग्रवाल,गौरव पियुष, मयंक वार्ष्णेय , यश शर्मा, आदित्य दादिया,आलिष अवलनी,श्रीनिवास सरकार, कुशाग्र मांगलिक,अनिकेत दामले,यशवर्धन कनोई,मनीष मर्यादा,कवन अँटनी या भारतीयांना फोर्ब्सच्या '30 अंडर 30 एशिया' या यादीत स्थान मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे सरन्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT