Freedom At Midnight esakal
Premier

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' (Freedom At Midnight) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

priyanka kulkarni

Freedom At Midnight: विविध विषयांवर आधारित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच आता नव्या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.'फ्रिडम एट मिडनाइट' (Freedom At Midnight) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यामधील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कलाकारांच्या लूकनं वेधलं लक्ष

'फ्रिडम ॲट मिडनाईट' ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये सिद्धांत गुप्ता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत आहे, तर चिराग वोहरा हा 'महात्मा गांधी' यांच्या भूमिकेत आहे. तसेच राजेंद्र चावला हा 'सरदार वल्लभभाई पटेल' यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या वेब सीरिजमधील तिघांच्या लूकला नेटकऱ्यांच्या पसंती मिळत आहे.

सिद्धांत गुप्ता शेअर केला लूक

इंस्टाग्राम अकाउंटवर सिद्धांत गुप्ता, चिराग वोहरा आणि राजेंद्र चावला यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाईट' या वेब सीरिजमधील कलाकारांच्या लूकचा फोटो सिद्धांतनं शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "मी फ्रिडम ॲट मिडनाईट-डोमिनिक लॅपीअर आणि लॅरी कॉलिन्सचा पहिला लूक शेअर करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याची कहाणी सांगताना मला खूप अभिमान आणि सन्मान वाटतो."

कधी रिलीज होणार सीरिज?

'फ्रिडम ॲट मिडनाईट' ही वेब सिरीज लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. ही सीरिज लवकरच Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सिद्धांत गुप्ताने 'स्कॅम 1992' या वेब सीरिजमध्ये काम केले होते. तसेच 'ज्युबिली' मधील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता तो जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT