Friend Request esakal
Premier

Friend Request: 'त्या' तिघांची गुंतवणारी गोष्ट, कलाकारांचा खणखणीत अभिनय; विचार करायला भाग पाडणारं 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' नाटक

Friend Request: ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटकाची गोष्ट घडते मुंबईत एका कंपनीच्या एचआर विभागात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या माधव सहस्रबुद्धे (अजय पुरकर)च्या घरात.

महेंद्र सुके

Friend Request: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी २०१९ मध्ये राज्यभरातील वेगवेगळ्या भागांत दहा नाट्यवाचन कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्यातील कल्याणमध्ये झालेल्या कार्यशाळेत प्रसाद दाणी यांनी लिहिलेले ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटक वाचले होते. दहा कार्यशाळेत वाचलेल्या सुमारे 30 नाटकांपैकी प्रसाद यांचे हे एकमेव नाटक व्यावसायिक रंगभूमीवर चालू शकेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. आता पाच वर्षांनंतर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटकाची गोष्ट घडते मुंबईत एका कंपनीच्या एचआर विभागात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या माधव सहस्रबुद्धे (अजय पुरकर)च्या घरात. घटस्फोट झाल्याने घरात ते एकटेच राहतात. कौटुंबिक दुराव्यामुळे ते दु:खी आहेत; पण ते गझल गायनात रमतात. कंपनीच्या कामात गुंतून राहात असले तरी, एक कोपरा दु:खी असतोच. त्याच दु:खावेगामुळे ते मधल्या काळात अतिमद्यपान करायला लागतात. त्या कठीण काळातील एका क्षणी जिग्नेश नावाचा एक रिक्षाचालक (आशिष पवार) त्यांना आधार देतो आणि त्यानंतर सहस्रबुद्धेकडे नियमित येणारा जिग्या त्यांच्या घरातील सदस्यासारखाच होऊन जातो. दोघांच्या ऋणानुबंधाने ते आनंदात असतात; पण एक दिवस या सहस्रबुद्धेच्या घरात मृण्मयी (प्रियांका तेंडोलकर) ही तरुणी प्रवेश करते. ओळखपाळख नसलेली मृण्मयी या नाटकाची उत्सुकता वाढवते.

प्रसाद दाणी यांचे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे वाटत असले तरी, जिग्या आणि सहस्रबुद्धेच्या संवादातून त्यांनी जीवनविषयक तत्त्वज्ञान पेरण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. काही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्टेटमेंट लक्षवेधी आहेत. त्यामुळे नाटक मनोरंजनासोबतच रसिकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. काही संवाद रसिकांची उत्स्फूर्त दाद मागणारे आहेत.

नाटक वाचनातून अनुभवणे आणि तेच प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहणे यातला अनुभव जरा वेगवेगळा असू शकतो; पण प्रसाद यांनी हे नाटक कार्यशाळेत वाचतानाही गुंतवून ठेवले होतेच. त्याचा रंगाविष्कार करताना प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी आणखी ताकदीने पेश केले आहे. दिग्दर्शकीय ट्रिटमेंट देताना विचारवाही आशय अधिक समृद्ध झाला आहे.

अभिनयात अजय पुरकर यांनी रंगवलेले सहस्रबुद्धे अनेक ठिकाणी रसिकांकडून टाळ्या वसूल करतात. त्यांच्यासोबत जिग्या साकारताना आशिष पवारने केलेली बॅटिंग पैसा वसूल आहे! सहकलाकार म्हणून अतुल महाजन (दामले/ मिस्टर पारेख) यांनी छोट्याशा भूमिकांतूनही नाट्यगोष्ट फुलवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. नाटकाची उत्सुकता वाढवणारी मृण्मयीची भूमिका साकारताना प्रियांका तेंडोलकरने या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक रंगभूमीवर आपले नाणे खणखणीतच वाजवले आहे.

सवाईगंधर्व आणि जमदग्नीवत्स संस्थेच्या वतीने ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ची निर्मिती आकाश भडसावळे, शैलेश देशपांडे, अजय पुरकर यांनी केली आहे. रंगमंचावर चार पात्र दिसत असले तरी, पडद्यामागे प्रत्येकच नाटकासाठी एक मोठी टीम कार्यरत असते. ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’साठीही कुमार सोहोनी (दिग्दर्शनासह प्रकाशयोजना), संदेश बेंद्रे (नेपथ्य), अशोक पत्की (संगीत), गुरू ठाकूर (गीत), सुरेश सावंत (नेपथ्य निर्माण), जयवंत सातोस्कर-सचिन कुंभार (रंगभूषा) आणि सूत्रधार दिगंबर प्रभू या सर्वांनी केलेली ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ रसिकांनी स्वीकारावी, अशीच आहे.

नाटक वाचून पाच वर्षे उलटल्यानंतर प्रसाद दाणी यांचे हे नाटक रंगमंचावर आले आहे. कोरोना काळात अशा अनेक संहिता प्रयोगांकित होण्याच्या प्रतीक्षेत असतील. त्या दिग्दर्शक, निर्माते आणि रंगकर्मींना खुणावतील. हळूहळू अशाच काही कलाकृती रंगभूमीवर येतील आणि रसिकमनाला समृद्ध करतील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT