Actor who are not present at Anant-Radhika Wedding Esakal
Premier

Anant Ambani & Radhika Merchant : आमिर खान ते कार्तिक आर्यन...या कलाकारांची अनंत-राधिकाच्या लग्नाला गैरहजेरी

This Bollywood Stars Skipped Anant-Radhika Wedding Bash : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला पण काही बॉलिवूड कलाकार या लग्नसोहळ्याला हजर राहिले नाहीत. कोण होते हे कलाकार जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Anant- Radhika Wedding : भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंतचा विवाहसोहळा राधिका मर्चंटबरोबर थाटात पार पडला. या आलिशान विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं बॉलिवूड कलाकारांनी. या लग्नसोहळ्याला जवळजवळ संपूर्ण बॉलिवूडमधील कलाकार, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हजर होते.

या लग्नसोहळ्याला आलिया भट्ट -रणबीर कपूर, विकी कौशल -कॅटरिना कैफ, शाहरुख खान-गौरी खान, सलमान खान, कियारा अडवाणी -सिद्धार्थ मल्होत्रा, माधुरी, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांसारख्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती आणि लग्नाला खूप धमालही केली. पण सध्या चर्चा होतेय ती या लग्नसोहळ्याला गैरहजर राहिलेल्या कलाकारांची. कोण आहेत हे कलाकार जाणून घेऊया.

या लग्नाला श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा व तिचा नवरा झहीर इकबाल, आमिर खान, कार्तिक आर्यन, सुश्मिता सेन, सैफ अली खान व करीना कपूर, करिश्मा कपूर, काजोल, अक्षय कुमार, कंगना रणौत, सनी देओल व बॉबी देओल, तब्बू, परिणीती चोप्रा, शिल्पा शेट्टी, भूमी पेडणेकर, आदित्य रॉय कपूर, तापसी पन्नू हे कलाकार गैरहजर होते.

याशिवाय रोहित शर्मा आणि त्याची पत्नी, विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे क्रिकेटरही गैरहजर होते.

कंगनाच्या घरी दुसरा कोणतातरी कार्यक्रम असल्यामुळे तिने या लग्नाला गैरहजेरी लावली तर कार्तिक आर्यन सध्या परदेशात व्हेकेशनसाठी गेला असल्याने तो ही या लग्नाला गैरहजर होता. तर विराट-अनुष्का सध्या लंडनमध्ये राहत आहेत आणि रोहित त्याच्या कुटूंबाबरोबर व्हेकेशन एन्जॉय करत असल्याने त्यांना या लग्नाला हजर राहता आलं नाही.

आज १३ जुलैला त्यांचं रिसेप्शन असून आज 'शुभ आशीर्वाद' हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर १४ जुलैला त्यांच्या लग्नानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमालाही अनेक सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT