bhool bhulaiyaa 3 esakal
Premier

Bhool Bhulaiyaa 3 Cast Fees: विद्यापेक्षा महागडा ठरला कार्तिक तर तृप्तीला सगळ्यात कमी फी, माधुरी दीक्षितचं मानधन किती?

Bhool Bhulaiyaa 3 Star Cast Fees: या दिवाळीत 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' मध्ये जोरदार घमासान होणार आहे.

Payal Naik

या दिवाळीत मोठ्या पडद्यावर दोन मोठ्या चित्रपटांची लढत होणार आहे. एकीकडे रोहित शेट्टी दिग्दर्शित मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' आहे. तर दुसरीकडे अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया ३' आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित यांसारखे सेलिब्रिटी आहेत. 'भूल भुलैया'च्या या स्टार्सपैकी कोणाला किती फी मिळाली ते जाणून घेऊया.

रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट जवळपास 150 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात 'भूल भुलैया 2' फेम अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात रूह बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला किती फी मिळाली याची आता चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने त्याची फी वाढवली असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने सर्वाधिक फी घेतली आहे. म्हणजे विद्या बालन, माधुरी आणि तृप्ती डिमरी यांची फी जरी एकत्र केली तरी ती कार्तिकच्या फीएवढी नाही.

शेवटच्या चित्रपटात फक्त 15 कोटी

'जागरण'च्या रिपोर्टनुसार, कार्तिकने रूह बाबाच्या भूमिकेसाठी सुमारे 48-50 कोटी रुपये फी घेतली आहे. 'भूल भुलैया 2'साठी कार्तिक आर्यनने जवळपास 15 कोटी रुपये फी घेतल्याची माहिती आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात मंजुलिकाची भूमिका साकारणारी विद्या बालन पुन्हा एकदा 'भूल भुलैया 3'मध्ये त्याच व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या भुताच्या भूमिकेसाठी विद्याला सुमारे 8 ते 10 कोटी रुपये मिळाले असल्याचं सांगण्यात येतंय.

तृप्ती डिमरीला सगळ्यात कमी मानधन

'भूल भुलैया 3'मध्ये माधुरी दीक्षितही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिला सुमारे 5 ते 8 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं वृत्त आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या प्रेमात पडलेल्या तृप्ती डिमरीला तिच्या भूमिकेसाठी फक्त 80 लाख रुपये मानधन मिळालं आहे. 'ॲनिमल' नंतर तृप्ती डिमरी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.

'भूल भुलैया 3' दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ला टक्कर देणार आहे. 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर लोकांना अधिक आवडला होता. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या चित्रपटाला तगडी टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT