Premier

Khatron Ke Khiladi 14: ‘खतरों के खिलाडी’ सीजन 14 मध्ये 'या' स्टारकिडची वर्णी ; मराठीतील कलाकार होणार सहभागी

Khatron Ke Khiladi season 14 : 'खतरों के खिलाडी' सीजन 14 ची घोषणा झाली असून यात एक मराठी अभिनेता सहभागी होणार आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

कलर्स हिंदीवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ चा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेला हा शो खूप प्रेक्षकांचा खूप लाडका आहे. या शोचा 14 वा सीझन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतीच या शोमधील स्पर्धकांची नाव जाहीर करण्यात आली आहेत आणि यात एका मराठी अभिनेताही सहभागी होणार आहे.

कलर्स हिंदीवरील ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री निम्रत कौर आहलूवालिया ‘खतरों के खिलाडी’ च्या 14 व्या सीझनमध्ये दिसणार आहे. तर  टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफसुद्धा या शोमध्ये सहभागी होणार आहे. टायगरची बहीणही त्याच्याप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे आणि पहिल्यांदाच एखाद्या टेलिव्हीजन शोमध्येही सहभागी होतेय.

यासोबतच सुमोना चक्रवर्ती, नियति फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा हे कलाकार सुद्धा या रिअलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच अभिनेता गश्मीर महाजनीसुद्धा ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सहभागी होतोय. काहीच दिवसांपूर्वी गश्मीरने याबाबत वक्तव्य केलं होतं.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये गश्मीरने याबद्दल खुलासा केला होता. तो म्हणाला,” मी नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या भीतीचा सामना करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. रोहित शेट्टीच्या कार्यक्रमासाठी मी माझ्या रोजच्या आयुष्यात बदल केला आहे. मला नवीन वेळेशी जुळवून घ्यायचं असल्याने मी माझ्या दिनचर्येचं खूप पालन करत आहे. मी वर्कआउट कधीच चुकवत नाही. मी फक्त माझी शारीरिक तंदुरुस्तीच नाही तर मानसिक तंदुरुस्तीचीही काळजी घेतोय. कारण ते खूप महत्त्वाचे आहे. मी माझ्या मुलाशिवाय ५ दिवसही लांब राहू शकत नाही. त्यामुळे मानसिकरित्या या गोष्टीची तयारी करतोय.”

गश्मीरने या आधी अनेक हिंदी टेलिव्हीजन शोमध्ये काम केलं आहे. 'इमली' ही त्याची स्टार प्लसवरील मालिका खूप गाजली होती. यानंतर त्याने अनेक वेब सिरिजमध्ये काम केलं आहे यासोबतच तो मराठी सिनेमांमध्येही काम करत आहे.  

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT