gaurav more  sakal
Premier

Gaurav More: काय होतं हास्यजत्रा सोडण्याचं खरं कारण? अभिनेत्याने अखेर सांगितलंच, म्हणतो- कुणी काही बोलायच्या आधी...

Gaurav More Left Hasyajatra: हास्यजत्रा सोडतोय हे सांगितल्यावर अशी होती गोस्वामी सरांची रिअ‍ॅक्शन; म्हणाले- आता परत...

Payal Naik

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष अविरत सुरू आहे. करोनाकाळात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः नवसंजीवनी दिली. याच कार्यक्रमाने प्रेक्षकांची अशा काही अवलिया कलाकारांशी गाठ घालून दिली जे पुढे चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागले. त्यातील एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळख असणारा गौरव आज चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र त्याने हास्यजत्रा सोडली तेव्हा अनेकजण नाराज झाले होते. आता त्याने त्यामागचं कारण सांगितलं आहे.

गौरवने नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यात बोलताना त्याने हास्यजत्रा सोडण्याचं कारण सांगितलं. आपल्या कामात तोच तोच पणा येत असल्याचं त्याने सांगितलं. हास्यजत्रा का सोडली हे सांगताना गौरव म्हणाला, 'मी खूप वर्ष हास्यजत्रेत काम करत होतो. सलग पाच वर्ष मी तिथे काम करत होतो. त्यामुळे माझ्यामध्ये तोचपणा तोचपणा येत होता, माझ्या रिअ‍ॅक्शनदेखील कुणी काही बोलायच्या आधी तयार असायची. त्याच रिअ‍ॅक्शन येत होत्या. मला थोडं थांबायला हवं असं वाटायला लागलं. तेव्हाच हिंदीतून काम आलं आणि मोजके एपिसोड होते.'

पुढे गौरव म्हणाला, 'म्हटलं की चला लिमिटेड जूनपर्यंत आहे ना मग करुया आपण. मग हे जरा वेगळं काम आहे, तिथे आपल्या सारख्या रिअ‍ॅक्शन येणार नाहीत. म्हणून मी निर्णय घेतला. हास्यजत्रा सोडताना मी सेटवर सगळ्यांना अंदाज दिला होता. त्यांना सांगितलेलं असं असं आहे तर मी जरा थांबेन. कारण कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं. गोस्वामी सरांना सांगितलं तर ते म्हणाले की थोडा ब्रेक घे, नंतर परत ये. पण मीच म्हणालो, आता त्याचं प्रतिक्रिया यायला लागल्यात. पाच वर्ष इकडे काम करतोय. मी पण जरा थांबतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fire Tragedy : बाईकला धडकून स्लीपर बस पेटली, २० जण जिवंत जळाले; ४० जण करत होते प्रवास...

Leopard Falls Into Well : शिकार करायला गेला अन् शिकारी झाला! रत्नागिरीत बिबट्या विहिरीत पडल्याचा थरारक प्रकार

Latest Marathi News Live Update : पुढील तीन दिवस नाशिकसह घाट परिसराला यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

Washim Crime: आमखेड्यात समाजातील वादातून युवकाचा खून; चार गंभीर जखमी विनाक्रमांकाच्या दुचाकी सोडून हल्लेखोर फरार

AI Greeting Cards: तंत्रज्ञानाच्या युगात भावनाही झाल्या डिजिटल; शब्दांऐवजी डिजिटल पत्राद्वारे भावना व्यक्त

SCROLL FOR NEXT