Kartik Aaryan sakal
Premier

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मामा-मामीचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse: कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू झाला आहे.

priyanka kulkarni

Kartik Aaryan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनवर (Kartik Aaryan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली दबून त्याच्या मामा-मामीचा मृत्यू झाला आहे.

13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर येथे एक मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत काही लोकांचा जीव गेला. यामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचा देखील मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर सुमारे 56 तासांनंतर कार्तिकच्या मामा आणि मामी यांचे मृतदेह सापडले.

कार्तिकचे मामा मनोज चांसोरिया आणि त्याची मामी अनिता चांसोरिया यांचा घाटकोपर येथील दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कार्तिकचे मामा मनोज चांसोरिया हे एअर ट्रॅफिक कंट्रोलचे माजी व्यवस्थापक होते. मनोज चांसोरिया आणि अनिता चांसोरिया हे जबलपूर येथील मरियम चौक, सिव्हिल लाईन्समध्ये राहत होते.

रिपोर्टनुसार, मनोज चांसोरिया आणि अनिता चांसोरिया हे दोघे कारने मुंबईला गेले होते. सोमवारी ते जबलपूरला परतत होते. यावेळी ते पेट्रोल भरण्यासाठी मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर थांबले होते. मयत मनोज चांसोरिया आणि त्याची पत्नी अनिता चांसोरिया हे रविवारी त्यांचा मुलगा यशला भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार होते, ते व्हिसा काढण्यासाठी मुंबईला गेले होते.

या घटनेनंतर अमेरिकेतील यश आणि मनोज यांचा मेहुणा डॉ. परमल स्वामी यांनी मुंबई गाठली. रिपोर्टनुसार, बुधवारी घटनास्थळी पोलिसांना ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह सापडले. हे मृतदेह तीन दिवस ढिगाऱ्याखाली दबला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. शेवटी यशने दागिन्यांवरून आई-वडिलांची ओळख पटवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT