Girish Karnad sakal
Premier

Girish karnad: लेखक, दिग्दर्शक अन् हाडाचा कलाकार; भारतीय सिनेसृष्टीच्या शिरपेचातील मानाचा तुरा 'गिरीश कर्नाड'

गिरीश कर्नाड यांनी एक डझनपेक्षा अधिक नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

राजाराम सूर्यवंशी

Girish Karnad: चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत संवेदनाक्षम व बुध्दीमान व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे,असे चित्रपट अभिनेते,दिग्दर्शक, लेखक, नाटककार, अनेक बहुमोल पुरस्कार प्राप्त असे, आपल्या सर्वांना त्यांच्या कसदार अभिनयाने खिळवून ठेवणारे उत्तम कलाकार श्री गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांचा जन्म बदलापूर-नेरळ जवळील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी 19 मे 1938 रोजी झाला होता.

कृष्णाबाई मानकीकर या एक विधवा स्त्री. त्यांचे माहेर माथेरान! त्या बॉम्बे मेडिकल सर्विसेसमध्ये परिचारिकेचे प्रशिक्षण घेतांना त्यांची ओळख तेथल्या डॉ रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली होती. डॉ रघुनाथ कर्नाड हे आर्य समाजीयन होते. तसेच ते जातीभेद व स्त्रि-पुरुष विषमतेच्या विरोधी होते. म्हणून त्यांनी विचारसरणीला अनुसरुन विधवा कृष्णाबाईंशी आर्य समाजीयन पध्दतीने ,ब्राह्मण मध्यस्थाविना, रितसर लग्न केले होते. कृष्णाई व डॉ रघुनाथ यांना चार अपत्य झालीत. गिरीश कर्नाड हे त्यांचे तिसरे अपत्य होते.

पुण्यात शालेय शिक्षण अन् नाटकांचे संस्कार

गिरीश कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले होते. तसेच याच पुण्यात त्यांच्यावर नाटकांचे संस्कार बालगंधर्व व किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या सहवासात झाले होते. त्यांचे उच्चशिक्षण ऑक्सफर्ड येथे लिंकन कॉलेजात झाले होते व त्यांनी काही काळ शिकागो विद्रापिठात हंगामी प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. पुण्याहून ऑक्सफार्डला जाण्यापुर्वी गिरीश कर्नाड हे कर्नाटक आर्ट महाविद्यालयातून गणित व संख्याशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीत बी.ए.उत्तीर्ण झाले होते. तर, इंग्लंडमध्ये त्यांनी तत्वज्ञान,राज्यशास्त्र व अर्थशास्त्रांमध्ये पदवीत्तर शिक्षण पुर्ण केल्यावर १९६२ मध्ये त्यांची ऑक्सफर्ड युनियनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ या कालावधी कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते.तर १९८८-१९९३ या काळात कर्नाटक नाटक अकादमीचे सभापती होते.

गिरीश कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड व हिंदी सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. व त्यात अभिनयही केला होता. गिरीश कर्नाड यांनी एक डझनपेक्षा अधिक नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले होते. त्यांच्या या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्नाटक विद्यापिठाने डॉक्टरेट व युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने त्यांना डी.लिट.पदवीने सन्मानित केले होते.त्याशिवाय गिरीश कर्नाड यांना खालील प्रकारचे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले होते.

१) कालिदास सन्मान पुरस्कार

२) तन्वीर सन्मान पुरस्कार. 2012

३) " नागमंडल"साठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कारा.[१९९२]

४) पद्मभुषण [१९९२]

५) पद्मश्री [१९७४]

६) " भुमिका " चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार

७) सर्वोत्कृष्ट चित्रपट " कनक पुरःदर"साठी सुवर्ण कमल पुरस्कार[१९८९]

८) "वंशवृक्ष" या चित्रपटाच्या उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार [१९७२]

९) " संस्कार" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पूरस्कार [१९७०]

१०)संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार [१९७२]

११) साहित्य अकादमी पुरस्कार [ १९९४ ]

१२) होमी भाभा फेलोशिप [ १९७०-७२ ]

१३) ज्ञानपीठ पुरस्कार [ १०९८ ]

१४) राजोत्सव पुरस्कार.

गिरीश कर्नाड यांनी ' आडाडता आयुष्य ' (खेळता खेळता आयुष्य ) या नावाने कानडी भाषेत आत्म चरित्र लिहिले होते.त्याचे 'घडले कसे' या नावाने मराठी भाषांतर ' राजहंस प्रकाशनाने' छापून प्रसिध्द केले होते.

गिरीश कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी विशेष प्रसिध्द होते.त्यांच्या खालील सर्व नाटकांची मराठी इंग्रजी व भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.

१) अग्नी मत्तू मळे (मराठु अनुवाद-अग्नी आणि पाऊस)

२) काटेसावरी

३)टिपू सुलतानचे स्वप्न .

४) तलेदंड ( हे नाटक लग्न लावणारा ब्राह्मण पोरोहित व मयताचे संस्कार करणारा ब्राह्मण पुरोहित यांच्यातील वैचारिक संघर्षावर आधारित होते )

५) तुघलक

६) नागमंडल

७) बलि

८) भंगलेले बिंब पुष्पसाज

९)ययाति

१०) हयवदन. गिरीश कर्नाड यांची ही सर्व नाटके कानडी भाषेत लिहिलेली होती व त्या सर्वांचे मराठी भाषांतरे विविध मराठी लेखकांनी केली होती.

" हयवदन" हे नाटक गिरीश कर्नाडांनी १९७२ मध्ये लिहिले होते. हे नाटक जर्मनीतील थाॕमस मान यांनी लिहिलेल्या "नावेल ट्रांसपोज़ड हेड्स " या नाटकावर आधारित होते.

"हयवदन" म्हणजे घोड्याचं डोकं व मानवाचे शरीर असणारा प्राणी. मानवी जीवनातील अंर्तविरोधावर भाष्य करणारे हे प्रभावी नाटक होते.मानवी जीवनातील अपुर्णता , ताण-तणाव यावर नाटक अधारित होते.

विशेष म्हणजे "हयवदन " या नाटकाने भारतीय जातिव्यवस्थेतील पुरुषसत्ताक समाजधारणा व स्त्रिसत्तावादी मातृसत्ताक समाजधारणा यावर स्त्रीवादी नेणिवेतून एक नविन मिश्र परंतु सृजनशील तडजोडावादी व्यवस्था जन्माला घालून आजच्या विषम व पृथकवादी कप्पेबंद समाजव्यवस्थेवर एक सामाईक उपाय दाखविला होता, जो वैचारिदृष्ट्या आजही अभिनव आहे. या विषयावर आज पन्नास वर्षानंतरही पुरेसे मंथन झालेले नाही.

सत्यशोधक शरद पाटलांनी "हयवदनवर" केलेली समिक्षा आजही वाचनिय व गिरीश कर्नाडांची वैचारिक प्रतिभाझेप दाखवणारी आहे.

गिरीश कर्नाडांनी नव्वदीच्या दशकात "कन्नड सिनेमातील जातिसंघर्ष" हा एक पेपर सादर केला होता, या पेपरने त्याकाळी माझ्यासारख्या अनेक लेखक व विचारवंतांना भारतीय जातिय वास्तवाच्या दशाननी परिणामांवर विचार करायला प्रवृत्त केले होते.त्या पेपरचा व अर्थात गिरीश कर्नाडांचा विचारांचा प्रभाव आजही आमच्यासारख्या अनोख्या सामाजिक लिखाण करणाऱ्यांवर कायम आहे. व कायम राहिल.

गिरीश कर्नाडांनी आपल्या प्रतिभेने भारतीय सिनेमा व नाट्यसृष्टीला जवळजवळ पाउण शतक भारावून ठेवले होते व तीला संपन्न केले होते.

भारतीय जातिव्यवस्था हा त्यांचा चिंतनाचा विषय होता व जातिव्यवस्थाअंत हा त्यांचा उद्देश होता.कारण या जातिव्यवस्थेत समग्र स्त्रीजातीची शोषणाची बीजे व कष्टकऱ्यांच्या दमणाचे भाले रुतले आहेत ,हे त्यांनी जाणले होते व या बीजं आणि भाल्यांना कसं उपटून फेकता येईल आणि मानवी जीवनातील 'अपुर्णता' 'पुर्णते' त कशी बदलता या अखंड ध्यासाने त्यांनी सातत्याने लेखन व दिग्दर्शन केले होते. जे आज मैलाचा दगड शाबीत झाले आहे.

अशा या अवलिया माणसाला ,ज्याला कायम नाविन्याचा ध्यास होता , त्यांना ,त्यांच्या लेखणीला व कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT