Ravi Kishan sakal
Premier

Ravi Kishan: "मोदींच्या ध्यानधारणेमुळे सूर्यदेव शांत झाले, कडक उन्हात वारे वाहू लागले"; रवी किशन नेमकं काय म्हणाले?

Narendra Modi: मतदान केल्यानंतर रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ध्यान साधनेबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

priyanka kulkarni

Ravi Kishan: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतादान सध्या देशभरात सुरु आहे. यूपीच्या पूर्वांचलमध्ये आज लोक मतदान करत आहेत. तर गोरखपूरमध्ये रवी किशन (Ravi Kishan) यांनी पहिल्यांदाच मतदान केलं. आहे. मतदान केल्यानंतर रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ध्यान साधनेबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाले रवी किशन?

गोरखपूरमधील मतदान केल्यानंतर रवी किशन यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आजचे हवामान आल्हाददायक आहे, तिथे (कन्याकुमारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधनेत बसून सूर्यदेवाला शांत केले, कडक उन्हामध्ये आज जोरदार वारे वाहू लागले. हे रामराज्याचे मोठे लक्षण आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराट रुपात येणारचे हे लक्षण आहे आणि माझा भारत खूप मोठा होईल, विकासित होईल आणि भारत सोने की चिड़िया होईल, भारत कधीही झुकणार नाही, भारतासमोर लोक झुकतील."

रवी किशन म्हणाले, "महादेव मतदानाची टक्केवारी वाढवतील"

गोरखपूरमध्ये मतदानाच्या टक्केवारीबद्दल देखील रवी किशन यांना विचारण्यात आलं. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "येथे ऐतिहासिक मतदान होणार आहे, महादेव मतदानाची टक्केवारी वाढवतील."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ध्यानधारणा

30 जून रोजी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी मोदींनी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 45 तास ध्यानधारणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT