Premier

Kartik Aaryan : कार्तिकच्या नावे तरुणीची लाखोंची फसवणूक, गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक

Goregaon woman duped for over 82 lakhs : गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची कार्तिक आर्यनला भेटवण्याचा नावाखाली लाखोंची फसवणूक झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजच्या नावाचा वापर करून फसवणुकीचं प्रमाण बरंच वाढलंय. सध्या असंच एक प्रकरण समोर आलंय. अभिनेता कार्तिक आर्यनच्या नावे एका स्त्रीची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गोरेगाव इथे राहणाऱ्या ऐश्वर्या नावाच्या तरुणीबाबत ही घटना घडलीये. या तरुणीला ८२.७५ लाख रुपयांसाठी फसवल्याचं समोर आलंय. कृष्णा शर्मा असं या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून २०२२ साली तिची फसवणूक कार्नाय्त आली आहे.

कृष्णा शर्माने ऐश्वर्याला त्याच्या लव्ह इन लंडन या सिनेमाच्या निर्मितीसाठी ८२.७५ लाख रुपये गुंतवायला सांगते आणि त्याच्या बदल्यात तिला कार्तिक आर्यनला भेटवण्याच प्रॉमिस केलं होतं.

पोलिसांनी केली अटक

कृष्णा शर्माला आंबोली पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर या आधीही असे फसवणुकीचे गुन्हे दाखल असून हे गुन्हे आंबोली बरोबरच वाकोला, मुंबई विमानतळ, दिल्लीतील कॅनोट प्लेस, आणि चेन्नई E3 टेन्याम्पेट या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. आता सदर व्यक्तीवर पुढील कारवाई होणार आहे.

कार्तिकच्या आगामी सिनेमाची चर्चा

कार्तिक आर्यनचा आता 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमात तो एका पॅरालिम्पिक अथलीटची भूमिका साकारणार आहे. मुरलीधर पेटकर या पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या या स्पर्धकाची खरी गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कबीर खान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

या सिनेमासाठी कार्तिकने फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन केलं असून त्याने वर्षभर गोड खाल्लं नव्हतं पण सिनेमातील काही सीनसाठी त्याने वजनही वाढवलं होतं.

या सिनेमाचा प्रीमियर दिल्लीमध्ये मुरलीकांत पेटकर आणि लष्करप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याची चर्चा आहे.

कार्तिकचा लवकरच 'भुलभुलैय्या २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात कार्तिक बरोबर विद्या बालन, माधुरी दीक्षित, राजेश शर्मा आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

SCROLL FOR NEXT