Gudi Padwa 2024 esakal
Premier

Gudi Padwa 2024: नीतू कपूर यांनी घरी गुढी उभारत साजरा केला गुढीपाडवा; बॉलिवूड कलाकारांनी हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Gudi Padwa 2024: बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

priyanka kulkarni

आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. आज घरोघरी गुढ्या उभारत नवीन वर्षं थाटात साजरं केलं जातं. फक्त सामान्य जनताच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक्सवर मराठीत ट्विट करत सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. "नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचली रांगोळी दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन...गुढीपाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🌹🙏🏻" असं ट्विट करत त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर गुढीची पूजा करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हिरव्या रंगाच्या पैठणीत माधुरी खूप सुंदर दिसत होती. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत तिला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

पहा व्हिडीओ:

तर सगळ्यांचं लाडकं कपल रितेश आणि जिनिलियानेसुद्धा त्यांच्या मुलांसोबत गुढीपाडव्याचा सण थाटात साजरा केला. रितेशने दोन्ही मुलांसोबत सकाळी लवकर उठून गुढी उभारली आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मुलांवर ते करत असलेले संस्कार याचं अनेकांनी सोशल मिडीयावर कौतुक केलं.

तसंच कपूर कुटूंबाच्या घरीसुद्धा यंदा गुढी उभारली गेली. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या घरी उभारलेल्या गुढीचा फोटो शेअर करत सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची मुलगी रिधिमा सहानीने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

यासोबतच शिल्पा शेट्टी, रविना टंडन, वाणी कपूर, अंकिता लोखंडे, सोनाली बेंद्रे, प्रीती झिंटा, मलायका अरोरा, अजय देवगण यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हे वर्ष सगळ्यांना चांगलं जावं अशी प्रार्थनाही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT