Sanju Rathod Live Performance Esakal
Premier

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात 'गुलाबी साडी'वर थिरकले बॉलिवूड कलाकार ; संजू राठोडचा लाईव्ह परफॉर्मन्स व्हायरल

Sanju Rathod Performs in Anant- Radhika Wedding : गुलाबी साडी फेम गायक संजू राठोडने अनंत अंबानीच्या वरातीत लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

Sanju Rathod : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा अजूनही होतेय. १२ जुलैला पार पडलेल्या विवाहसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी मंडळी हजर राहिली. या लग्नात अनेक दिग्गज गायकांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर केले. तर अनंतची वरातही खूप गाजली. संपूर्ण बॉलिवूड अनंतच्या वरातीमध्ये सामील झालं होतं आणि यावेळी एका मराठमोळ्या गायकाने केलेला परफॉर्मन्सही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

'गुलाबी साडी' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या गायक संजू राठोडला चक्क अंबानींच्या वरातीमध्ये परफॉर्मन्स सादर करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं केलं. संजूने 'गुलाबी साडी' हे गाणं सुरु करताच सगळे बॉलिवूडकर खुश झाले आणि त्यांनी या गाण्यावर नाचायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी संजूच्या या अचिव्हमेंटचं कौतुक केलं. 5262.studios या इंस्टाग्राम हॅन्डलने संजूचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काही महिन्यांपासून संजूचं ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असून हे गाणं तुफान गाजलं आहे. अनेक इन्फ्लूएंसर्सबरोबर अनेक कलाकारांनीही यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केले आहेत. या गाण्यामुळे संजूला रातोरात प्रसिद्धी मिळाली आणि तो स्टार गायक बनला आहे. आतापर्यंत त्याने अनेक लाईव्ह कार्यक्रमांना आणि टीव्हीवरील अनेक शोजमध्ये हजेरी लावली आहे.

 संजूच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, "मराठी गाण्यावर सर्वांना नाचवलंस, मानलं भावा तुला." तर दुसऱ्याने, “जस्टीन बीबरपेक्षा तरी चांगलं गायलास” अशी कमेंट केली आहे तर एकाने कहर केलाय भाऊने...!! अशी कमेंट करत त्याचं कौतुक केलं. अनेकांनी तुझा खूप अभिमान वाटतो अशीही कमेंट केली आहे.

आज जिओ कॉनव्होकेशन सेंटर मध्ये अनंत राधिकाचं रिसेप्शन पार पडणार असून या सोहळ्याला देखील अनेक पाहुणे हजेरी लावणार असल्याचं समजतंय. या शाही सोहळ्याला जगभरातून प्रसिद्धी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT